मुंबई : अलिकडच्या काळात योगाबद्दल लोकांमध्ये चांगली जागृती झाली आहे. पण योगासनांमुळे तुम्ही फक्त फिट आणि हेल्दी राहत नाही तर ताणही कमी होतो. योगासनांचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. एक असे आसन आहे जे केल्यामुळे तुमची एनर्जी, स्टॅमिना वाढत नाही तर त्याचा ताण दूर करण्यासही फायदा होतो. या आसनाचे नाव आहे अधोमुख श्वानासन.


फायदे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तणाव दूर करण्यासाठी हे आसन अधिक परिणामकारक ठरतं. या आसनामुळे खांदे, हातांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो व ते मजबूत होतात. त्याचबरोबर मासिक पाळीत किंवा मेनोपॉजच्या वेळेस होणाऱ्या त्रासावर या आसनाने आराम मिळतो.


आसन करण्याची पद्धत


  • सर्वात आधी पोटावर झोपा. त्यानंतर पाऊलं बोटांवर ठेवा.

  • हात छातीच्या बाजूला घेत हात आणि पायांच्या बोटाच्या आधारावर संपूर्ण शरीर वर उचला. डोके दोन्ही हातांच्या मध्यातून खाली घाला. 

  • या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

  • त्यानंतर हळूहळू आसन सोडा.



काय काळजी घ्यावी?


  • प्रेग्नंसीमध्ये हे आसन करताना पायात थोडे अंतर ठेवा. काही त्रास होत असल्यास तज्ञांच्या मदतीने हे आसन करा. 

  • पाठ किंवा खांदेदुखी असल्यास हे आसन करणे टाळा. 

  • उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनीही हे आसन करु नये.

  • हात, मनगटाचे काही दुखणे असल्यास हे आसन करणे टाळा.