मुंबई: आंबा हे फळ शरीरासाठी फार फायदेशीर आहे. अँटीऑक्सीडेंट, प्रोटीन, व्हिटॅमीन 'ए', 'बी' आणि 'सी'ची भरपूर मात्रा असलेले हे फल शरीराला आरोग्यदाई आहे. पण, या फळाचे सेवन केल्यावर या ३ घटकांचे मुळीच सेवन करू नका. अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. कारले, मिर्ची आणि दही रायता हे ते तीन घटक होय.


कारले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबा खाल्यानंतर कारले मुळीच खाऊ नका. कारण, आंबा हा गोड असतो तर, कारले कडू. गोड पदार्थावर जेव्हा कडू पदार्थ खाल्ला जातो तेव्हा त्याची रिअॅक्शन येते. असा प्रकारे रिअॅक्शन झाली तर, त्या व्यक्तीला उलटी, मळमळ, श्वसनास त्रास आदी गोष्टींचा सामना करावा लागतो. काही प्रमाणात व्यक्ती आजारीही पडतो.  


मिर्ची


आंबा खाल्यावर शक्यतो ३ तास तरी, मिर्चीचे सेवन करू नका. जर तुम्ही आंबा खाल्ल्यावर मिर्चीचे सेवन केले तर, तुम्हाला पोटात जळजळ, आग आदी गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.


दही रायता


आंबा खाल्ल्यावर चुकूनही दही रायता खाऊ नका. आंबा खाल्ल्यावर दही रायत्याचे सेवन केल्यास घसा, डोके दुखू शकते. सर्दी आणि खोकलाही संभवतो. तसेच, काही रूग्णांमध्ये हगवण लागण्याचे प्रमाणही बळावते.