मुंबई : अनेकदा आपली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी मेसेज किंवा फोन करण्याचा अतिरेक केला जातो. अशा वेळी सावधान.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही नात्याची खरी सुरूवात होते ती संवादाने. पहिल्या भेटीत होते ती ओळख. ही ओळख नात्यात बदलण्यासाठी महत्त्वाचा दूवा ठरतो तो म्हणजे संवाद. आणि अलिकडील काळात संवाद म्हटले की, फोनला पर्याय नाही. पण, तुमची जर एखाद्या मुलीशी नव्यानेच ओळख झाली असेल तर संवाद साधताना काळजी घ्या. विशेषत: फोनवरून संवाद साधताना. अनेकदा आपली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी मेसेज किंवा फोन करण्याचा अतिरेक केला जातो. अशा वेळी सावधान. हा अतिरेक कटाक्षाणे टाळा. अन्यथा तुमच्या नव्यानेच निर्माण होऊ पहात असलेल्या नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो.


कोणत्या वेळी फोन किंवा मेसेजचा अतिरेक टाळावा?


पहिल्या डेटनंतर : पहिल्या डेटनंतर शक्यतो फोन किंवा मेसेज यांचा अतिरेक करणे टाळा. पहिल्या भेटीनंतर समोरच्या उत्सुकतेबद्धल उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. पण, तरीही अतिरेक करू नका. त्यातून तुमचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या व्यक्तिच्या कामात सतत अडथळाही येऊ शकतो.


राग आल्यावर : तुम्ही जर मद्यपाण किंवा नशिल्या पदार्थांचे सेवन केले असेल तर, तुम्ही मुलांना फोन किंवा मेसेज करूच नका. अशा वेळी आपले स्वत:च्या विचारांवर कोणतेही नियंत्रण नसते. त्यामुळे नको ते शब्द, नको ते विचार आणि नको ते मुद्दे आपल्याकडून व्यक्त केले जाऊ शकतात. ज्यामुळे नात्यात दूरावा निर्माण होते.


विनोद करण्याचा मूड असताना : जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तिला पूर्णपणे ओळखत नाही. खास करून मुलींना. तोपर्यंत समोरच्या व्यक्तिची चेष्टा करणं. त्याच्यावर विनोद करणं किंवा एखाद्या मुद्दयावर कोटी करून बोलणे शक्यतो टाळा. कारण, तुम्ही ज्या मुद्द्यावर विनोद करू पाहता तो मुद्दा समोरच्यासाठी अत्यंत संवेदनशील असू शकतो.


रात्री उशीरा : मुलींना किंवा शक्यतो कोणत्याच व्यक्तीला अतिमहत्त्वाच्या कामाखेरीज रात्री उशीरा फोन किंवा मेसेज करणे टाळा. एक तर रात्री उशीरा फोन करणे सभ्यतेचे लक्षण नाही. तसेच, आपल्या उशीरा केलेल्या फोनमुळे समोरच्या व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे अशा वेळी फोन किंवा मेसेज यांचा अतिरेक टाळाच.