मुंबई : कोरोना (Corona) व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरुच आहे. या विषाणूचा सामान्य परिस्थितीवर परिणाम झाला आहे. देशभरात लॉकडाउनची स्थिती आहे. कोरोनाचा डबल म्युटंट व्हेरिएंट व्हायरसपासून संक्रमित लोकांना श्वास घेताना त्रास होत आहे. आरोग्य मंत्रालयाने ऑक्सीजनची पातळी कमी होताच रुग्णालयाच दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. (Yoga For Increase Oxygen Level)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूचा नवा प्रकार अधिक घातक ठरत आहे. त्यामुळे ऑक्सीजनची पातळी कमी होऊ नये म्हणून काही योगासने देखील केली पाहिजे. योगासने केल्याने शरीराची शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. शरीरात ऑक्सीजनती लेवल वाढवण्यासाठी ताडासन केले पाहिजे. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन सुरळीत राहतो. 


researchgate.net मध्ये आलेल्या बातमीत ताडासनचे (Tadasana) फायदे सांगण्यात आले आहेत. या योगामुळे शवसन प्रक्रियेमध्ये सुधारणा झाली आहे आणि रिकव्हर होण्यास ही मदत झाली आहे. यामुळे शरीराचं पोस्चर देखील व्यवस्थित होते. फुफ्फुसांचा वरचा भाग सक्रीय करतो. डॉक्टर्स दमा असलेल्या व्यक्तींना देखील ताडासन करण्यासा सल्ला देतात.



सूचना : वरील माहिती ही सामान्य परिस्थितीसाठी आहे. तुम्हाला कोणताही त्रास असल्यास आधी डॉक्टरांचा आणि वैद्यकीय सल्ल्या घ्या.