Roti Cooking Causes Cancer : भारतीयांच्या ताटातील सर्वात महत्त्वाचे अन्नपदार्थ म्हणजे चपाती, फुलके किंवा भाकरी...या शिवाय त्यांचं जेवण अपूर्ण असतं. गव्हापासून तयार करण्यात येणारी पोळी कोणाकडे तेल लावून तवावर भाजली जाते. पण अनेक ठिकाणी फुलके आणि भाकरी खाण पसंत करतात. फुलके आणि भाकरी बनवत असताना अनेक जण त्या एका बाजूने तव्यावर भाजून झाल्यानंतर थेट गॅसवर भाजतात. जेव्हा ती पोळी आणि भाकर गॅसवर टम्म फुगते तेव्हा पोळी जमली असं म्हणतात. (Roti facts)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात गॅसवर अशाप्रकारे चपाची करणं आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर एक संशोधन समोर आलं ज्यात थेट गॅसवर अशाप्रकारे भाकरी किंवा फुलके भाजल्याने कॅन्सरचा धोका वाढतो, असं सांगण्यात आलं आहे. (Do you also cooking roti bread directly on the gas flame cause cancer What do the experts say video viral google Trending News)


अभ्यासात उघड झाले भयानक सत्य!


जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एक संशोधन करण्यात आलं. या अभ्यास अहवालानुसार, असं म्हटलं गेलं आहे की, कुकटॉप्स आणि एलपीजी गॅस स्टोव्हमधून नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यासारखे अनेक धोकादायक वायू उत्सर्जित होत असतात. हे वायू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने  म्हटलं आहे. या खतरनाक वायूपासून श्‍वसनाच्या आजारांसोबतच कॅन्सर आणि हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. एवढंच नाही तर आपल्या जीवाला धोका निर्माण होतो असही या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अशाप्रकारे चपाती बनवणं धोकादायक 


न्युट्रिशन एंड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका संशोधनानुसार असाही दावा करण्यात आला आहे की, हाय फ्लेमवर पोळी भाजल्यानंतर त्यातून कार्सिनोजेनिक पदार्थ (Roti Cooking Causes Cancer) तयार होतो. त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो. अस्थमाच्या रुग्णांना यामुळे जास्त समस्या उद्भवतात. 


खरंच पोळी गॅसवर भाजल्याने कर्करोग होतो का?


ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांच्या मते, गॅस स्टोव्हच्या ज्वालावर फुलके किंवा भाकरी थेट भाजली तर त्यातून ऍक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण संशोधनातून जो दावा करण्यात आला आहे, त्यात किती तथ्य आहे, हे सांगणं कठीण आहे. पण या संशोधनाच्या अभ्यास अहवालामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, हे नक्की.