मुंबई : शरीरातील काही समस्या, त्रास आपल्याला शरीरातील कमतरतेची लक्षणे असतात तर काही मोठ्या गंभीर आजारांचा इशारा देतात. तुम्हाला यापैकी कोणत्या समस्या आढळतात का? मग त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पहा कोणत्या समस्या शरीराविषयी काय सांगतात ते....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. कंबरेजवळ चरबी सुटत असल्यास हे मधुमेहाचे लक्षण आहे. महिलांची कंबर ३४ इंच आणि पुरुषांची कंबर ४० इंचापेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचा धोका वाढतो. अधिक वजन मधुमेहाला निमंत्रण देते.


#2. डोळ्यांजवळील डार्क सर्कल्स अपुऱ्या झोपेचे लक्षण आहे किंवा एखादी एलर्जीही असू शकते.


#3. पायांच्या बोटांच्यामध्ये सफेद चट्टे येत असतील किंवा कट्स गेले असतील तर पायांच्या स्वच्छतेची अधिक काळजी घ्या.


#4. ओठांच्या कडा फाटत असतील तर शरीरात व्हिटॉमिन बी ची कमतरता आहे.


#5. केसगळतीचे प्रमाण वाढत असल्यास शरीरात आयर्नची कमतरता असल्याचे समजावे.


#6. नखं खूप तुटत असल्यास फंगल इंफेक्शन किंवा थायरॉईडचा त्रास असू शकतो.


#7. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास शरीरात पाणी आणि फायबर्सची कमतरता आढळते.