शेवग्याच्या झाडाच्या पानाचे `हे` आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?
शेवग्याचं झाड सर्वांनाच माहित असेल, मधुमेहाची समस्या असेल तर वाचा ही बातमी!
Health Benefits of Moringa : शेवग्याचं झाड सर्वांनाच माहित असेल, बाजारामध्ये शेवग्याचा शेंगा विकताना अनेकांना आपण पाहिलं असेल. शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रथिने, अमीनो अॅसिड, फायबर, जीवनसत्त्वे बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकार आणि मधुमेहाची समस्या असेल तर त्याच्या पानांचे चूर्ण त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. (Do you know thede health benefits of fenugreek leaves? Health Marathi News)
ड्रमस्टिकमध्ये अँटीफंगल, अँटीव्हायरल आणि अँटीडिप्रेसेंट गुणधर्म असतात. शेवग्याच्या पानांची पावडर बनवण्यासाठी आधी त्याची पाने तोडून उन्हात वाळवावी. पाने नीट सुकल्यानंतर नीट बारीक करून घ्या, नंतर त्याची पावडर रोज कोमट पाण्यात घ्या, याचा तुम्हाला फायदा होईल. यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते.
शेवग्याची पाने खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ लागते. यासोबतच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी होण्यास मदत होते.
शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि इतर अनेक संसर्गजन्य रोगांशी लढण्यास मदत करतात.
शेवग्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील योग्य प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात आणि त्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिसशी लढण्यास मदत करतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)