मुंबई : आपण रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत आहात? जर तुम्ही अशी औषधं घेत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शास्त्रज्ञांनी नुकतंच केलेल्या एका संशोधनात असं आढळलं आहे की, ही औषधं स्मृती कमी होण्याच्या प्रक्रियेला हळूवार करण्यास मदत करतात. यामुळे, स्मरणशक्ती बर्‍याच काळासाठी कायम राहते आणि म्हातारपणातही स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्निया विद्यापीठातील तज्ज्ञांनी याविषयी 12,000 लोकांचं परीक्षण केलं. यामध्ये तज्ज्ञांनी संपूर्ण तीन वर्ष या व्यक्तींना डेटा गोळा केला. 


शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या व्यक्ती रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी गोळ्या घेतात, त्यांची स्मृती कमी (मेमरी डिक्लाइंड) होण्याची प्रक्रिया मंदावते. विशेष म्हणजे, रेमीप्रिल आणि लिसिनोप्रिल सारख्या काही रक्तदाब नियंत्रित गोळ्या या प्रकरणात चांगलं काम करतात.


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी औषधं ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करतात. 3 वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर तज्ज्ञांनी हा निकाल जारी केला आहे.


डॉ. नेशन यांनी सांगितले की, उच्च रक्तदाबासाठी ब्लड प्रेशरच्या गोळ्या फार उपयुक्त ठरू शकतात. त्याचप्रमाणे डिमेंशियाच्या बाबतीत मेंदूची प्रक्रिया हळूवार करतं. केवळ याद्वारे जीव वाचू शकतो शिवाय  स्मृती गमावण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातही एक नवीन आशा निर्माण होत असल्याचं दिसतंय