उपाशी पोटी अंजीरचे पाणी पिणे ठरते फायदेशीर

Health benefits:अंजीरला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर अनेक आजारांपासून तुमचे सरंक्षण करते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. अंजीरचे पाणी पिल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते.

Oct 07, 2024, 16:30 PM IST

Fig water benefits: सकाळची निरोगी सुरुवात तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायले तर जीवनशैली आरोग्यदायी बनते. १ ग्लास भिजलेल्या अंजीरचे पाणी आणि २ भिजलेले अंजीर खाऊन तुम्ही दिवसाची सुरूवात करणे अत्यंत उत्तम ठरेल.अंजीर हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि अंजीरच्या पाण्याचे देखील भरपूर फायदे आहेत.कोणते ते जाणून घ्या.

 

1/8

सकाळी उठून अंजीरचे पाणी पिणे ठरते फायदेशीर  

2/8

प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी

अंजीर हे अत्यंत फायदेशीर फळ असून सुपरफूड मानले जाते.अंजीरमध्ये अनेक पोषक घटक असल्यामुळे ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीरचे पाणी प्रजनन क्षमता सुधारण्यासाठीही मदत करते.  

3/8

पचनसंस्था सुधारण्यासाठी

आपल्या नियमित डाएटमध्ये अंजीरचा समावेश करून घेणे उत्तम ठरते.अंजीरचे पाणी डिटॉक्स करण्यास मदत करते.अंजीरच्या पाण्यात भरपूर प्रमाणात फायबर असते जे तुमच्या पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरते.

4/8

चांगल्या त्वचेसाठी उपयोगी

आपल्या आहारात अंजीरच्या पाण्याचे समावेश केल्यास शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. यामुळे त्वचा हेल्दी राखण्यास फायदा होतो. त्वचेसंबंधित समस्यांसाठी हे एक सुपरफूड मानले जाते. यामुळे नियमित २ अंजीर रात्री भिजवा आणि सकाळी अंजीरचे पाणी पिऊन २ भिजवलेले अंजीर खा.  

5/8

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अंजीरच्या पाण्याचे सेवन करू शकता. वजन कमी करण्यासाठी शरीराला जास्त फायबर असणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते आणि अंजीरमधून ते अधिक प्रमाणात शरीराला मिळते. त्यामुळे वजन कमी करण्याकरिता सकाळी उपाशीपोटी अंजीराचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  

6/8

हाडे मजबूत होण्यासाठी

अंजीरचे सेवन बदाम अथवा मनुकाप्रमाणे केले जात नाही. तर केवळ १ वा २ अंजीर रात्री पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी आणि फुगलेले अंजीर खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.  

7/8

महिलांसाठी अधिक फायदेशीर

महिलांसाठी अंजीरचे पाणी अधिक फायदेशीर मानले जाते.पीएमएस आणि पीसीओडी महिला रुग्णांसाठीही अंजीर खूप फायदेशीर ठरते.गर्भवती मातांसाठीही अंजीरचे सेवन गुणकारी असते.

8/8

ब्लड शुगर पातळी हेल्दी राखण्यासाठी

अंजीरमध्ये हाय पोटॅशियम असून क्लोरोजेनिक अ‍ॅसिड असते.ज्यामुळे ब्लड शुगरची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. टाइप २ डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी रोज भिजलेले अंजीर खाण्यामुळे ब्लड शुगरच्या पातळीत कमतरता येते आणि शुगर नियंत्रित होते.     (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)