Swelling in Eyelids:  डोळे हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. तुम्हाला माहितेय का? डोळ्यांचे संरक्षण हे पापण्यांमुळे होत असते. डोळ्यांमध्ये धूळ आणि माती जाण्यापासून पापण्या संरक्षण करतात. अनेकदा पापण्यांवर सूज आल्याचे दिसून येते. (Do your eyelids swell Know the causes and home remedies nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा लोकांना असे वाटते की डोळ्यांच्या पापण्यावर सूज येणे हा आजार आहे पण तसे नसून इतर कारणे देखील असू शकतात. पापण्यांची सूज सामान्यतः ऍलर्जी, संसर्ग किंवा दुखापतीमुळे होते. पापण्या सुजण्याची अनेक कारणे असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया पापण्या सुजण्याची कारणे आणि घरगुती उपाय-


आणखी वाचा - Instant Glow : दिवाळीत चेहरा उजळेल लख्ख.. घरच्या घरी करा हे दही फेशियल...


पापण्या सुजण्याची कारणे -


1. ऍलर्जी
2. पापण्यांच्या तेल ग्रंथी बंद होणे
3. पापण्यांचा संसर्ग
4. तुमच्या डोळ्याच्या सॉकेटभोवती संसर्ग
5. गुलाबी डोळा


सूजलेल्या पापण्यांसाठी उपचार -


सूजलेल्या पापणीचा उपचार हा त्याच्या कारणांवर अवलंबून असतो. वरील कारणांप्रमाणे तुम्हाला डोळ्याचा संसर्ग झाल्यास, तुम्हाला संसर्ग दूर करण्यासाठी अँटीबायोटिक, आय ड्रॉप्स, मलम किंवा इतर औषधे वापरण्याची गरज आहे.


1. गरम कापडाने डोळ्यांना शेक द्या


पापण्यांची सूज कमी करण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या. आता या गरम पाण्यात कापड बुडवून ते पिळून पापण्यांवर लावा. हे दिवसातून दोनदा किंवा तीनदा करा. असे केल्याने ग्रंथींना चिकटणारे तेलही निघून जाते. त्यामुळे खाज येण्याची समस्याही दूर होते.


2. पापण्या स्वच्छ धुवा


कधीकधी पापण्यांना खाज येते, त्यामुळे सूज येते. अशावेळी बेबी शॅम्पूने पापण्या धुवा. यामुळे पापण्या साफ होतातच, पण सूजही दूर होते.


आणखी वाचा - Parenting Tips : तुमच्या मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतंय ना.. मग फॉलो करा या टीप्स


3. आयड्रॉप वापरा


तुमच्या डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही आयड्रॉप चा वापर करु शकता. अँटीहिस्टामाइन ड्रॉप ऍलर्जीपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)