Instant Glow : दिवाळीत चेहरा उजळेल लख्ख.. घरच्या घरी करा हे दही फेशियल...

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणण्यासाठी दही कसे वापरावे ते जाणून घेऊया.

Updated: Oct 4, 2022, 10:29 PM IST
Instant Glow : दिवाळीत चेहरा उजळेल लख्ख.. घरच्या घरी करा हे दही फेशियल...   title=
Instant Glow Diwali will brighten your face Do this curd facial at home nz

Dasara Skin Care Tips : सध्याच्या फास्ट जगात स्वत:च्या स्कीन केअरकडे लक्ष देणे खूप कठीण होत चाललं आहे. पण सणांमध्ये ही कारणं देऊन चालत नाही कारण आपल्याला त्या दिवसांमध्ये छान दिसायचे असते. आपल्याजवळ वेळ कमी असतो आणि अशात आपल्याला इंस्टंट ग्लो हवा असतो. त्यासाठी तुम्हाला पार्लरच्या वाऱ्या करायची गरज नाही किंवा महागडे प्रोडक्ट घेण्याची ही गरज नाही... तुम्हाला घरच्या घरी इंस्टंट ग्लो हवा असल्यास आम्ही या बातमीत तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. कधी दह्याचे फेशियल केले आहे का? चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणण्यासाठी दही कसे वापरावे ते जाणून घेऊया. (Instant Glow Diwali will brighten your face Do this curd facial at home nz)

दही आणि अंड्याचे फेशियल
एका वाटीत एक अंड्याचा पांढरा भाग आणि एक चमचा दही मिक्स करा. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. हे मिश्रण सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. दह्यामुळे त्वचा मऊ आणि स्वच्छ राहते तर अंड्यामुळे त्वचेवरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.

आणखी वाचा - Hair Care Tips : डोक्यावरील पिंपल्सचा कसा करा उपाय, मिळेल मोठा रिलीफ..

क्लिंजर

तुमचा चेहरा पाण्याने ओला करून त्यावर दही लावून काही वेळ हलक्या हातांनी चोळावे. यानंतर टिश्यू पेपरने चेहरा स्वच्छ करा आणि थंड पाण्याने धुवा. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर क्लिंजर म्हणूनही करू शकता. 

हायपरपिग्मेंटेशनपासून मुक्ती मिळवा
केळीची साल काढून एका भांड्यात ठेवा आणि चमच्याने मॅश करा. यानंतर मॅश केलेल्या केळीमध्ये दोन चमचे दही घाला. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर तुम्हाल पिपंल्स सारख्या समस्या असतील तर उपाय करुन पहा.

आणखी वाचा - IRCTC Goa Package : भाई चलो गोवा! IRCTC ने तुमच्यासाठी आणलंय भन्नाट गोवा पॅकेज, आताच जाणून घ्या...

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)