मुंबई : फावल्या वेळेत किंवा गप्पा मारताना तुम्ही काहीजणांना सतत  दोन्ही हाताची नखं एकमेकांवर घासताना पाहिलय का? यामुळे केसगळती कमी होते असा काहींचा समज आहे. पण यामध्ये खरचं काही तथ्य आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन सर्च केले तर काहींना ही पद्धत निव्वळ मूर्खपणा वाटतो. तर काहींना असे नियमित  केल्याने खरचं बदल जाणवला आहे. तर मग पहा या कृतीमागील खरे वैज्ञानिक सत्य !


या कृतीमागील वैज्ञानिक सत्य :


चायनिज अ‍ॅक्युप्रेशरतंत्रानुसार, शरीराचा काही भाग हलकासा दाबल्यास किंवा घासल्यास दुसर्‍या ठिकाणी त्याचा प्रतिसाद दिसतो. बोटांच्या टोकांशी संपणार्‍या नसा टाळूशी जोडलेल्या असतात. त्यामुळे नखं एकमेकांवर घासल्यास तयार होणार्‍या घर्षणातून टाळूजवळील नसांना चालना मिळते. टाळूला होणारा रक्तप्रवाह सुधारतो. परिणामी या कृतीमुळे केसांची वाढही सुधारते. त्यामुळे फावल्या वेळेत किंवा अगदी टीव्ही पाहता  पाहता टाळूला स्पर्शही न करता थेट मसाज देऊ शकता. 


कसा कराल केसगळतीवरील हा उपाय : 


दिवसभर हातांची नख एकमेकांवर घासण्याची गरज नाही. दिवसभरात हा प्रयोग केवळ 5-10 मिनिटे मात्र नियमित करणे पुरेसे आहे.
केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही किमान एवढा वेळ काढूच शकता. आणि पहा काय बदल होतो… सोबतच  केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत ठरू शकतात. त्याकडेही वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.