मद्यपानाचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण द्राक्षापासून तयार होणारी वाईन ही हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास फायदेशीर मानली जाते, असं एका संशोधनाचा दावा आहे. बार्सिलोना विद्यापीठाच्या संशोधनातून असं समोर आलंय, की दररोज एक ग्लास वाइन प्यायल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो. या स्पॅनिश संशोधनात ज्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त आहे आणि भूमध्यसागरीय आहाराचे पालन करतात त्यांच्यावर अल्कोहोल घेतल्यास काय परिणाम होतो हे तपासण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेडिटेरियन डाइट वनस्पती म्हणजे भूमध्ये आहार वनस्पती आहार हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला गेलाय. या डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचं अधिक प्रमाणात सेवन केलं जातं. तर दुधाचे पदार्थ, अंडी, मांस किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ या डाएटमध्ये वर्ज्य असतात. त्याशिवाय या डाएटमध्ये साखर किंवा मीठ देखील मर्यादित प्रमाणात घेतलंज जातं. 


संशोधनात काय सिद्ध झालं?


संशोधनातून असा दावा करण्यात आलंय की, जे लोक दररोज अर्धा किंवा एक ग्लास रेड वाईन पितात त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या होण्याची शक्यता 50 कमी असते. तर या संशोधनात ज्यांनी खूप कमी वाइन प्यायली आणि अजिबात प्यायली नाही. जर कोणी आठवड्यातून एक ग्लास ते दररोज अर्धा ग्लास प्याला तर त्याला अल्कोहोल कमी प्रमाणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका 38 टक्क्यांनी कमी झाल्याचा या संशोधनातून आढळून आलंय. 


संशोधनावर तज्ज्ञांचं काय मत आहे?


बार्सिलोना युनिव्हर्सिटीचे रिसर्च लीडर प्रोफेसर रेमन ॲस्ट्रुक म्हणाले, 'इतर संशोधनाच्या तुलनेत आम्हाला अल्कोहोलचे अधिक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आम्हाला जोखीम मध्ये 50 टक्के कपात आढळली, जी स्टॅटिन सारख्या काही औषधांद्वारे प्रदान केलेल्या आरामापेक्षा खूप जास्त आहे.' 


संशोधनात सहभागी सुमारे 1232 सहभागी भूमध्यसागरीय आहार घेत असणारे लोक त्यांना टाइप 2 मधुमेह, धूम्रपान किंवा उच्च कोलेस्ट्रॉल आहे. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढला. या लोकांना त्यांच्या आहाराबद्दल विचारण्यात आलं आणि त्यांची लघवीची चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये टार्टेरिक ऍसिडची पातळी तपासण्यात करण्यात आला. 


हे रसायन नैसर्गिकरित्या द्राक्षे आणि वाइन सारख्या द्राक्ष उत्पादनांमध्ये आढळतं आणि मूत्रमार्गे उत्सर्जित होतं. संशोधनात सहभागी नसलेल्या तज्ज्ञांनी इशारा दिली की पुरावे मर्यादित आहेत आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणे नुकसानदाय असू शकतं.


ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या वरिष्ठ आहार तज्ज्ञ ट्रेसी पार्कर म्हणतात, 'संशोधन आढळळं की कमी किंवा मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, मात्र रेड वाईनची बाटली पिणे हा एकमेव उपाय नाही.'


'हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की हे संशोधन रेड वाइन आणि हृदयाच्या समस्यांमधील संबंध सूचित करतो, मात्र पूर्णपणे सत्यापित करत नाही. यासाठी अजून संशोधनाची गरज आहे. जास्त मद्यपान केल्याने हृदय आणि रक्ताभिसरण संबंधित समस्या जसे उच्च रक्तदाब, यकृत समस्या आणि काही प्रकारचे कर्करोगचा धोकाही वाढवतो. 


रेड वाईन पिण्याचे फायदे 


रेड वाइन विविध अँटीऑक्सिडंट्ससह द्राक्षे आंबवून बनविली जात असल्याने याचं सेवन केल्यास अनेक फायदे होतात, असं तज्ज्ञ सांगतात. 


रेड वाइनसाठी वापरल्या जाणाऱ्या द्राक्षांमध्ये रेझवेराट्रॉल, कॅटेचिन, एपिकॅटेचिन आणि प्रोन्थोसायनिडिन्स सारख्या विविध अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असतो.


संशोधकांना असं आढळून आलं की, रेड वाइन प्यायल्याने त्वचेचा रंग उजळतो. तारुण्य वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.  


जर आपण दररोज एक ग्लास रेड वाइन पित असाल तर यामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते. 


रेड वाइनमध्ये मेलाटोनिन, झोपेला उत्तेजन देणारे कंपाऊंड समृद्ध असते. त्यामुळे निद्रानाशाने त्रस्त असलेले लोक दररोज एक ग्लास रेड वाइन पिऊ शकतात. पण ते रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी हे प्या. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)