मुंबई : महिला त्यांच्या दररोजच्या कामामध्ये अशा काही चुका करतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. यातील एक चूक म्हणजे महिला पोटावर झोपतात. जर तुम्हीही दिर्घकाळ पोटावर झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आज आपण जाणून घेऊया की, पोटावर झोपल्याने नेमक्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. 


  • जेव्हा तुम्ही दीर्घकाळ पोटावर झोपून असता तेव्हा तुमच्या स्तनांमध्ये वेदना होण्याची शक्यता असते. यावेळी स्तनांमध्ये वेदना होतात कारण पोटावर झोपल्याने स्तनांवर दाब पडतो. ज्यामुळे वेदना होण्याची शक्यता उद्भवते.

  • गर्भवती महिला जर पोटावर झोप असतील तर त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. 

  • दीर्घकाळ पोटावर झोपल्याने पोटासंबधीच्या तक्रारी जाणवतात. यामध्ये खाणं योग्य पद्धतीने न पचणं, क्रॅम्स येणं तसंच पोटदुखी अशा समस्या येतात. 

  • जर महिला जास्त वेळ पोटावर झोपत असतील तर त्वचेच्या स्नायूंवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. शिवाय यावेळी त्वचेला पुरेसा ऑक्सिजन न मिळण्याची समस्या उद्भवते.