HEALTH TIPS :  मोबाईलचा वापर करण्यातच तुमचा दिवस जात असेल, तर आताच सावध व्हा. ही बातमी मोबाईलचा अतिवापर करण्याऱ्यांसोबतच विशेष म्हणजे तरुणांसाठी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या काळात प्रत्येक वर्गाकडून मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा वापर सर्रास झाला आहे.  स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांना आणि त्वचेलाही हानी पोहोचते.  एका संशोधनानुसार, फोन, लॅपटॉप आणि टीव्हीच्या ब्राईट स्क्रीनमुळे युझरच्या डोळ्यांशिवाय त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.  तसेच, या उपकरणांच्या स्क्रीनमधून निघणारा ब्लु लाईट तुम्हाला अकाली वृद्ध बनवु  शकतो.
माशांवर ब्लु लाईटचा प्रभाव जाणून घेण्यासाठी, त्यांना 2 दिवस, 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवस गडद निळ्या प्रकाशाखाली ठेवण्यात आले.  यानंतर माशांच्या मायटोकॉन्ड्रियावर ब्लु लाईटचा परिणाम तपासण्यात आला.  संशोधनानुसार, ब्लु लाईटचा केवळ माशांच्या डोळ्यांवरच वाईट परिणाम होत नव्हता, तर त्यांच्या त्वचेच्या पेशीही खराब होत होत्या.मोबाईलमधील ब्लु लाईटमुळे डोळ्यांसोबतच तुमच्या त्वचेचेही नुकसान होते, असे संशोधनातून समोर आलय.


ब्लु लाईट आणि स्कीनचा संबंध


फोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणारा ब्लु लाईट त्वचेच्या पेशींमध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो, जसे की त्वचेच्या पेशी कमी होऊ शकतात किंवा काहीवेळा या पेशी नष्टही होऊ शकतात, हे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे.  पेशींमधील हे बदल तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारे बनवू शकतात.




संशोधनानुसार, जर तुम्ही एका तासापेक्षा जास्त काळ ब्लु लाईटच्या संपर्कात असाल तर ते तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये बदल करू लागते. त्यामुळे अनेक वेळा त्वचेवर काळे डागही पडतात.  जास्त ब्लु लाईटच्या संपर्कात आल्याने डोळ्यांमध्ये लालसरपणा, सूज आणि कोरडेपणा येऊ शकतो.