Do`s and Dont`s During Peiods : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. शरीरात होणारे हे बदल कधी मानसिकतेपर्यंत पोहोचतात हेच अनेकजणींना कळत नाही. (Mood Swings) मूड स्विंग्स, डोकेदुखी, पोटदुखी, प्रमाणाहून जास्त रक्तस्त्राव (Bleeding) या आणि अशा बऱ्याच समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो. मासिक पाळीच्या काळादरम्यान नेमकं काय करावं आणि काय करु  नये याविषयीची माहिती असणं अतीव महत्त्वाचं. त्यातही हे कर ते कर सगळ्याजणी सांगतात. पण, काय करु नये हे मात्र सांगितलंच जात नाही. ज्यामुळं कित्येकदा अडचणींची परिस्थिती उदभवते. त्यामुळं जाणून घेऊया, मासिक पाळीदरम्यान नेमकं काय करु नये... (menstruation cycle )


शारीरिक संबंध (Physical Relations)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासिक पाळीदरम्यान (Periods) शारीरिक संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक संबंध ठेवल्यास मासिक पाळीदरम्यान संसर्गाचा धोका असतो. त्यामुळं तुमच्या जोडीदारालाही संसर्ग होऊ शकतो. (sex During periods)


Tampons वापरणं 


हल्लीच्या दिवसांमध्ये अनेक महिला मासिक पाळीदरम्यान Tampons वापरतात किंवा काहीजणी सिलिकॉन कपचा (Silicon Cup) वापर करतात. पण, Tampons चा प्रमाणाहून जास्त वापर केल्यास योनीमार्गाचा संसर्ग होऊ शकते. ज्यामुळं महिलांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम दिसून येतात. 


वाचा : Double Chin घालवायची असेल तर घरच्या घरी 'या' गोष्टी करा फॉलो!


 


अती प्रमाणात कॉफीचं सेवन (Coffee)


मासिक पाळीदरम्यान कॉफीचं सेवन करणं अनेक महिलांना गुणकारी वाटतं. पण, प्रमाणाहून जास्त कॉफी प्यायल्यास डिहायड्रेशन (Dehydration) होऊन अशक्तपणा सतावू शकतो. 


वारंवार Vagina स्वच्छ करणं 


मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव ही सर्वसामान्य बाब आहे. या दिवसांमध्ये स्वच्छताही अतीव महत्त्वाची. पण, वारंवार Vagina स्वच्छ करणं, त्या भागात जोरात पाणी मारणं यामुळं Vaginal Infection वाढतं. 


पेन किलर (Pain Killer)


मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना असह्य वेदना होत असतात. ओटीपोट, पाठ, कंबर, हात-पाय दुखण्यासोबतच ताप किंवा तत्सम समस्याही बऱ्याचदा अनेकांना भेडसावतात. यावर उपाय म्हणून बऱ्याचदा पेन किलर घेतली जाते. पण, वारंवार असं केल्यास महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढतं. शिवाय किडनी आणि यकृतावरही याचे थेट परिणाम होतात. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भावर आधारित असून, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )