मुंबई : कोणत्याही आजाराची समस्या असो डॉक्टर (Doctor) अशा काळात गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. तर अनेकदा वजन कमी करण्यासाठी देखील असा सल्ला दिला जातो. मात्र आतापर्यंत तुम्ही गरम पाणी (warm water) पिण्याचे फायदे ऐकले असतील, कधी त्याचे दुष्परीणाम ऐकलेत का? नाही ना मग जाणून घेऊय़ात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर तुम्ही अनेकांना गरम पाणी (warm water) पिताना पाहिलं असेल. काही वजन कमी (Weightloss) करण्यासाठी गरम पाणी पितात तर काही स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी. पण तुम्हाला माहित आहे का जास्त गरम पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला अनेक समस्या देखील उद्भवू शकतात.


आतड्यांसंबंधी समस्या
जास्त गरम पाणी (warm water) पिल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो.हे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते. जर तुम्ही आतड्यांसंबंधीच्या समस्येने त्रस्त असाल आणि गरम पाणी पित असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


झोप येण्यास त्रास होतो
झोपताना गरम पाणी (warm water) प्यायल्याने झोप येते.तसेच जास्त गरम पाणी प्यायल्याने लघवीला जास्त त्रास होऊ शकतो.


नसांची जळजळ
तहान न लागता गरम पाणी (warm water) प्यायल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊ शकते. त्यामुळे तहान लागल्यावरच गरम पाणी प्या, पुन्हा पुन्हा पिऊ नका. यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते.


मूत्रपिंडावर परिणाम
गरम पाणी (warm water) पिल्याने किडनीवर जास्त ताण पडतो, त्यामुळे किडनी निकामी होण्याची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे खूप गरम पाणी पिणे टाळा.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)