कमी पाणी प्यायल्यानं होऊ शकतात गंभीर समस्या! `या` गोष्टींची घ्या काळजी
Drinking less water : पाणी कमी प्यायल्यानं आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या गंभीर आजार होऊ शकतात आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया...
Drinking less water : तुम्ही या गोष्टीचा अनेकदा विचार केला असेल की पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी पिण्याची इच्छा होत नाही. इतकंच नाही तर आपल्याला शरीराला जितकं पाणी पिण्याची गरज उन्हाळ्यात असते तितकी थंडीत नसते. कमी पाण्यात प्यायल्यानं आपली बॉडी ही डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. कारण आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडू शकत नाही. पण थंडीतही तुम्ही खूप पाणी पिणं गरजेचं आहे. त्याची काय कारणं आहेत ते जाणून घेऊया...
पाणी कमी पिल्यास होऊ शकतात या समस्या...
1. कोरडी त्वचा-पिंपल्स
कमी पाणी पिण्याचा परिणाम हा आपल्या त्वचेवर लगेच दिसून येतो. त्वचेत कोरडेपणा दिसू लागतो. हिवाळ्यात घाम कमी येतो आणि पोर्स ओपन होत नाहीत. त्वचेवर चमक येण्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पिंपल्स देखील दिसत नाहीत.
2. अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता
शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास त्याचा पचनसंस्थेवर खूप जास्त परिणाम होतो. पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे हिवाळ्यात लोकांना अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो. अनेकांना बद्धकोष्ठतेच्या तक्रारीही वाढतात.
हेही वाचा : 'ईडीच्या भितीनं भलेभले 'त्या' कळपात जाऊ लागेल...', किरण मानेंची पोस्ट चर्चेत
3. वजन वाढणं
कमी पाणी पिण्याचे हे दुष्परिणाम देखील दिसून येतात. कारण जर तुम्ही पाणी कमी प्याल तर तुम्हाला जास्त भूक लागेल आणि जास्त खाल. त्यामुळे तुमचे वजन वाढू लागते.
हेही वाचा :
4. लघवीत पिवळेपणा
कमी पाणी प्यायल्याने किडनीवरही परिणाम होतो. कमी पाणी प्यायल्याने विषारी द्रव्ये पूर्णपणे बाहेर पडत नाहीत आणि लघवीमध्ये पिवळसरपणा आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवतात.
सगळ्या समस्यांपासून सुटका हवी असेल तर काय कराल?
भरपूर पाणी प्या. तहाण लागण्यासाठी काय करायला हवं? तर अशा काही अॅक्टिव्हिटी करा ज्यानं तुम्हाला खूप तहाण लागेल. कार्डिओ वर्कआऊट, रनिंग करा. घरी किंवा ऑफिस कुठेही लिफ्टनं जाण्या ऐवजी पायऱ्यांनी जा. बेडरूम आणि लिव्हिंग रूममध्ये पाण्याची बॉटल ठेवा. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंड पाणी पिण्या ऐवजी कोमट पाणी प्या.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )