चहा प्यायल्याने आपण काळे होतो?; वाचा विज्ञान काय म्हणतं!
जाणून घ्या, विज्ञानात असा पुरावा आहे का की चहा प्यायल्याने आपण काळे होऊ शकतो.
मुंबई : चहा प्यायला तर काळा होशील, ही गोष्ट तुम्हाला कधीतरी तुम्ही घरात सांगितली असेल आणि तुम्हाला चहा पिण्यापासून रोखलं असेल. पण त्यामागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का? चहा पिऊन आपण खरच काळे होऊ शकतो का? या बातमीत जाणून घ्या, विज्ञानात असा पुरावा आहे का की चहा प्यायल्याने आपण काळे होऊ शकतो.
चहा प्यायल्याने रंग काळा होतो
आपल्या शरीराचा त्वचेचा रंग मेलॅनिनच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असतो. यामुळे आपला रंग गोरा, काळा किंवा गडद आहे. संशोधनानुसार, चहा प्यायल्याने आपला रंग अजिबात काळा नाही, परंतु याउलट जर आपण योग्य प्रमाणात चहा प्यायलो तर तो आपल्या शरीरातील टॉक्सिन दूर राहण्यास मदत होते.
चहाबाबत लोकं का खोटं बोलतात?
चहा प्यायल्याने रंग काळा होतो, लहान मुलांनी चहा पिऊ नये म्हणून हा चुकीचा समज पसरवला गेला. चहामध्ये कॅफिन असतं ज्यामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो.
चहा पिण्याचे फायदे
चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. चहासह अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. हृदयविकार, कर्करोग आणि वृद्धत्वाच्या समस्यांचा धोका बर्याच प्रमाणात कमी होत असल्याचा दावा आहे.
चहा पिण्याने होणारं नुकसान
चहा पिण्याचेही तोटे आहेत. रिकाम्या पोटी चहा पित असाल तर सावधान. पित्त रस तयार होण्याच्या प्रक्रियेवर चहाचा परिणाम होतो. पित्ताच्या रसाच्या कमतरतेमुळे पचन व्यवस्थित होत नाही. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हायपर अॅसिडिटी आणि अल्सरचा धोकाही वाढतो.
(नोट- येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचा दावा करत नाही)