जेवणासोबत पाणी पिणे योग्य की अयोग्य? Sadhguru आणि डॉक्टरांच्या सल्ल्यात तफावत
जेवणासोबत पिणी प्यावं का? नेमकं कधी पाणी प्यावं? याबाबत संभ्रम असतो. अशावेळी अनेक आरोग्याबाबत संभ्रम निर्माण होतात. यावर सद्गुरु काय सांगतात?
अन्न आणि पाणी या शरीराच्या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. त्यांच्याशिवाय जगणे अशक्य आहे. जर तुम्ही दिवसभर पाणी किंवा अन्न सोडले तर शरीराला हालचाल करणे कठीण होते. पण अन्नासोबत पाणी पिऊ नये असे अनेकांचे मत आहे. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. पोटाच्या समस्यांमध्ये आम्लपित्त, गॅस, अपचन, पोट फुगणे, छातीत जळजळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता इत्यादींचा समावेश होतो. सद्गुरु जग्गी वासुदेव यांचाही असाच काहीसा विश्वास आहे.
जेवणासोबत लिक्विड खाण्याचे दुष्परिणाम
पचनक्रिया सुधारतात सद्गुरु जग्गी वासुदेवने सांगितलं की, जर तुम्ही जेवणासोबत जर कोणतं लिक्विड खाऊ शकता. यामुळे पोटात ऍसिड डायल्यूट होते याचा परिणाम शरीरावर होतो. हे ऍसिड पचनक्रियेसाठी महत्त्वाचे असते. डायल्यूट झाल्यामुळे पूर्ण प्रक्रिया खराब होऊ शकते. यामुळे जेवल्यानंतर थोड्यावेळाने पाणी प्यायला हवी.
डॉक्टर काय सांगतात?
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितले की, सद्गुरू काय म्हणत आहेत याचे समर्थन करण्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. शरीराचे शास्त्र सांगून त्यांनी आपले मत मांडले.
पाणी प्यायल्यामुळे पचनक्रियेवर होतो परिणाम डॉक्टरांनी सांगितले की, जेवल्यानंतर अन्न अन्ननलिकेतून जाते आणि पोटात पोहोचते. येथे पोटातील आम्ल रस अन्नाचे पचन करतात. या प्रक्रियेत पोटात असलेल्या पाण्याच्या प्रमाणावर कोणताही परिणाम होत नाही. त्यांनी पुढे सांगितले की पोटात पाणी असले तरी ते अवघ्या 20 मिनिटांत शोषले जाते. आम्लाचा रस पातळ केला तरी त्याचे प्रमाण इतके कमी असते की त्याचा पचनक्रियेवर विशेष परिणाम होत नाही. कशी होते पचनक्रिया आपल्या पोटाची पचनक्रिया अशी असते की, कोणत्याही प्रकारचे अन्न खाल्ले तरीही ते पचवू शकते. जर तुम्ही सामान्य ऍसिडचे पदार्थ खाल्ले तर त्याचा फार परिणाम होत नाही. जर जेवणामुळे ऍसिड तयार होत असेल तर पोटात कमी ऍसिड ज्यूस तयार होती. शरीराची ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)