मुंबई : मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. चांगला आहार घेतला नाही तर शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच असे अनेक ड्राय फ्रूटस आहेत जे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे जाणून घ्या मधुमेहामध्ये कोणते ड्रायफ्रुट्स खावेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हे' ड्रायफ्रुट्स खावेत
अक्रोड : मधुमेहामध्ये अक्रोड खाणे फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते आणि कॅलरीज कमी असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की मूठभर अक्रोड खाल्ल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.


बदाम : मधुमेहाच्या रुग्णांनी बदाम अवश्य खावेत. बदाम खूप फायदेशीर असतात. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होऊ लागते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णाने रोज भिजवलेले बदाम खावे.


काजू : काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेवरही नियंत्रण ठेवता येते. काजू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मधुमेहाच्या रुग्णाने काजू खावेत. त्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.


पिस्ता : पिस्ता मधुमेहामध्येही खूप फायदेशीर आहे. साखरेच्या रुग्णाने दररोज पिस्ते खावेत. पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.


'हे' ड्रायफ्रुट्स खाऊ नयेत?
मधुमेहाच्या रुग्णाने मनुका जास्त प्रमाणात खाऊ नये. बेदाण्यातील गोडपणामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अंजीर खाणेही टाळावे. मधुमेहाच्या रुग्णाने खजूरही खाऊ नयेत. हे सर्व ड्रायफ्रुट्स गोड असतात. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.


(Disclaimer:  येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.ZEE 24 TAAS  याची पुष्टी करत नाही.)