मुंबई : मासिकपाळीचा त्रास अनेक महिलांना त्रासदायक वाटत असला तरीही त्यावर स्त्रीयांचे आरोग्य अवलंबून असते. बदलत्या लाईफस्टाईलचा स्त्रियांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. जसे मासिकपाळी सुरू होण्याचं वय कमी झालं आहे तसेच आता रजोनिवृत्ती म्हणजेच मॅनोपॉजचा काळही कमी झाला आहे. 


मॅनोपॉजचा काळ कोणता? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समान्यपणे 45-50 या वयात मॅनोपॉज म्हणजेच स्त्रियांमध्ये मासिकपाळी बंद होते. मात्र हार्मोनल बदलांमुळे आता हे वय 30-40 इतके खाली आले आहे. भारतीय महिलांमध्ये  कमी वयात मॅनोपॉज येण्याचं प्रमाण वाढलं आहे. सुमारे 1-2% भारतीय महिलांमध्ये मॅनोपॉजची लक्षण 29-34 वयात दिसतात तर 8% लोकांमध्ये ही लक्षण 35-39 वयात मुलींमध्ये मॅनोपॉजची लक्षण दिसतात. मासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय


प्रीमेच्योर मेनोपॉजची लक्षण


अनियमित मासिकपाळी 
मासिकपाळीदरम्यान अत्यल्प किंवा अति प्रमाणात रक्तस्त्राव होणं
रक्तामधील संतुलन बिघडल्याने घाम येणं, उकडणं
हृद्याची धडधड वाढणं
गुप्तांगामध्ये बदल जाणवणं
त्वचा रूक्ष होणं
स्वभाव चिडचिडा होणं
झोप कमी होणं   


हृद्यविकाराचा धोका 


मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये हृद्यविकाराचा धोका बळावतो. त्यामुळे मासिकपाळी बंद झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीने त्यांच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष होणं गरजेचे आहे.  नियमित काही चाचण्यांद्वारा आरोग्यात होणार्‍या बदलांकडे लक्ष देणं गरजेचे आहे.