ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या-बसल्या कमी होणार पोटाची चर्बी; फक्त इतकंच करा की...
आताच वाचा ही मदतीची बातमी
Belly Fat Reduction Exercises: गेल्या काही वर्षांमध्ये स्थुलता आणि तत्सम समस्या अनेकांनाच भेडसावू लागल्या आहेत. रात्री उशिरापर्यंतं जागणं, अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणं या सर्व गोष्टी आणि बिघडलेल्या जीवनशैलीचे थेट परिणाम शरीरावर होऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे. यातच 9 ते 12 तासांच्या शिफ्टनंतर व्यायामशाळेत जाणं अनेकांसाठीच आव्हान.
परिणामी, अरे पोठ सुटलंय, पाठ दुखतेय, अंगदुखी आहे... अशा अनेक समस्या घेऊन आपल्यापैकी अनेकांचंच रडगाणं दररोज सुरुच असतं. पण, ऑफिसमध्ये बसल्याजागीही तुम्ही अशी काही जादू करू शकता, की तुमच्या पोटाची चर्बी सहजपणे कमी होईल.
ऑफिसच्या खुर्चीवर बसूनच करा हे व्यायाम प्रकार...
हँगिंग बॉडी-
हा एक असा व्यायाम प्रकार आहे ज्यामुळे संपूर्ण शरीराला एक सुयोग्य आकार मिळतो. यासाठी खुर्चीच्या दोन्ही काठांवर हात टेकवा आणि हातांवर जोर देत शरीराचा भार त्यांच्या बळावर उचलण्याचा प्रयत्न करा. असं करत असताना पाय सतत सरळ आणि आतल्या बाजला दुमडायचे आहेत. किमान 7/8 वेळा ऑफिसमध्ये तुम्ही हा व्यायाम करु शकता.
लेफ्ट राइट मूवमेंट-
अनेक तास एकाच पद्धतीनं बसल्यामुळं पाठ आणि कंबरदुखी ओढावते. अशा परिस्थितीत डाव्या आणि उजव्या बाजुला वळून तुम्ही आराम मिळवू शकता. यासाठी तुमचे हात आणि टेबलमध्ये काही अंतर ठेवा. असं केल्यानंतर शरीराला एकदा डाव्या आणि एकदा उजव्या बाजुला फिरवा.
कोर एक्सरसाइज-
या व्यायामप्रकारामुळं तुम्ही पाठ आणि सांधेदुखीला दूर करु शकता. यासाठी पाय पसरवा आणि पुन्हा सरळ स्थितीत आणाल. या व्यायामाचे 4 सेट फायदेशीर ठरतील.
(वरील माहिती सर्वसामान्य उपायांच्या आधारे देण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)