Potato For Weight Loss : हे वर्ष सरायला अवघे काही दिवस राहिले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांचे प्लॅन तयार झाले आहेत. जर तुम्हाला 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी वजन झपाट्याने कमी करायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) जबरदस्त प्लॅन सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वजन कमी करण्यासाठी बटाटा (Potatao) खाऊनही वजन कमी करता येतं. खरं तर Potatao Diet Plan हे अतिशय प्रभावीपणे कार्य करतं आणि काही दिवसात तुमचं वजन कमी करू शकतं. कसं ते जाणून घ्या...


काय आहे हा प्लॅन? 


वजन कमी करण्यासाठी Potatao Diet Plan अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. खरं तर, बटाट्यामध्ये उच्च कॅलरी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे दर आठवड्याला तुम्ही अनेक पौंड वजन कमी करु शकतात. खरं तरा, हा एक असा प्लॅन आहे ज्यामुळे चयापचय गतिमान होते आणि वजन वेगाने कमी होते. 


 


हेसुद्धा वाचा - Morning Tips : तुम्ही ब्रश करण्यापूर्वी पाणी पिता मग आधी 'ही' बातमी वाचा


 


प्लॅनचं पालन कसं करावं?


तीन ते पाच दिवस फक्त साधा, शिजवलेला बटाटा खा.


सामान्य नियमानुसार, दररोज 0.9-2.3 किलो बटाटे खा.


केचप, बटर, मलई आणि चीज यांसारखे मसाले आणि टॉपिंग्ससह इतर कोणतेही पदार्थ खाऊ नका.


मीठ घ्यावंसं वाटत असेल तर थोडं घ्या पण जास्त खाणं टाळा.


जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा फक्त पाणी, साधा चहा किंवा ब्लॅक कॉफी प्या.


या योजनेअंतर्गत जड व्यायामाची शिफारस केलेली नाही हे लक्षात ठेवा. त्याऐवजी हलका व्यायाम आणि चालण्यावर भर द्या.


हा प्लॅन कसा काम करतो?


वजन कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन चयापचय दर वाढविण्यावर कार्य करतं. यामुळे तुमच्या पोटाला कार्ब्स आणि कॅलरीज मिळतात, ज्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो. यामुळे पचनसंस्था जलद काम करते आणि वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय, यामुळे व्यायाम करण्याची शक्ती वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.


याशिवाय उच्च-कॅलरी बटाटा तुमच्या शरीरातील उर्जा पातळी वाढवण्यासाठी आणि संतुलित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. खरं तर, जेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता असते, तेव्हा चयापचय गती मंदावायला लागते, ज्यामुळे पचनसंस्था मंद गतीने काम करते आणि वजन कमी करणे कठीण होते.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)