Drink Water Before Brushing : अनेक लोकांना ही सवय असते सकाळी ब्रश न करता पाणी (water) प्यायची. मात्र ही सवय योग्य की अयोग्य याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. रात्रभर झोपल्यावर तोंडात घाण जमा होते असं अनेकांचं मत आहे. पण ही समज चुकीची आहे. सकाळी सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी (Empty stomach) पिणं ही योग्य पद्धत आहे. कारण शरीराला हायड्रेट (Hydrated) ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज सकाळी पाणी पिणं ही पद्धत योग्य आहे. तसंच दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं, असं डॉक्टर सांगतात. चला तर मग जाणून घेऊया यामागील सत्य काय आहे.
ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास तुमची पचनशक्ती वाढते. शिवाय अनेक लोकांना रात्रीच्या वेळी तहान लागते मग ते रात्री उठून पाणी पितात. खरं तर, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचं शरीर पाण्याचा वापर करतं, ज्यामुळे तुम्हाला रात्री कधी कधी तहान लागते. त्यामुळे सकाळी उठून पाणी प्यावं, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. (Morning Tips Drinking water before brushing in the morning is good or bad health tips)
मात्र असं मानलं जातं की, जर तुम्ही ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायले, तर तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ शकत नाहीत. या दरम्यान तुमचे तोंड जंतूमुक्त होईल. याशिवाय सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर तुम्हाला लवकर सर्दी होत असेल, तर तुम्ही सकाळी नक्कीच पाणी प्यावे. एवढंच नाही तर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची त्वचा आणि केस चांगले राहतात.
इतकंच नाही तर तुम्हाला हाय ब्लडप्रेशर आणि शुगरची तक्रार असेल, तर रिकाम्या पोटी पाणी प्यायलं तरी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यायले तर तुम्ही लठ्ठपणाची समस्या देखील टाळू शकता.
होय, तुम्हालाही वजन कमी करायचे असेल किंवा करायचे असेल तर सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.