Health Tips: सध्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा योग्य वेळेत जेवत नाही. आपण एकाच वेळेस अनेक कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्या समोर ही समस्या निर्माण होते. ऑफिस आणि इतर कामाच्या व्यस्ततेमुळे आपण रात्री उशिरा जेवायला बसतो. अशा परिस्थितीत योग्य वेळी अन्न न खाल्ल्याने किती नुकसान होते हे कळत नाही. या गोष्टींंकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन त्रास होण्याची शक्यता जास्त असते. रात्री उशिरा अन्न खाल्यास अनेक  समस्या उद्भवतात. (eating late at night then this habit can become dangerous nz)



रात्री उशिरा अन्न खाण्याचे तोटे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चरबी वाढण्याची शक्यता 
लठ्ठपणा येणे
झोप न येणे
आळस किंवा चिडचिड होणे


हे ही वाचा - एकाच रात्री कपलच पालटलं नशीब! घरात सापडला 400 वर्ष जुना खजिना


उशिरा जेवणं आरोग्यासाठी हानिकारक


याशिवाय जे लोक रात्री उशिरा अन्न खातात ते जेवणानंतर लगेचच अंथरुणावर झोपतात, ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी योग्य वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला त्याचे पूर्ण पोषण मिळेल. जर तुम्ही देखील रात्री उशिरा म्हणजेच 10 ते 12 वाजेच्या दरम्यान जेवण खाणाऱ्यांपैकी असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की जास्त उशिरा जेवणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. रात्री उशिरा अन्न खाण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चरबी वाढण्याची शक्यता वाढते.


रात्री उशिरा जेवल्याने पोटात आणि छातीत आम्लपित्त आणि जळजळ होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर आणि रक्तदाबावरही परिणाम होतो. त्यामुळे रात्री वेळेवर खाण्याचा प्रयत्न करा आणि या आजारांपासून दूर राहा.


 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)