मुंबई : तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये अ‍ॅक्ने, पिंपल्स, ब्रेकआऊट्सचा त्रास हमखास जाणवतो. त्यामुळे तेलकट त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अंड्याचा आहारात समावेश केल्याने शरीराला बळकटी मिळते. त्याप्रमाणे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीदेखील अंड फायदेशीर आहे. त्वचेसाठी अंड्यातील पांढरा विशेष फायदेशीर आहे. 


कसा कराल फेसपॅक? 


अंड आणि लिंबू -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंड्याचा पांढरा भाग वेगळा काढा. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. दहा मिनिटं हा फेसपॅक चेहर्‍यावर नैसर्गिकरित्या सुकू द्यावा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.  


या फेसपॅकमुळे चेहर्‍यावरील तेल कमी होण्यास मदत होते. सोबतच चेहर्‍यावरील ग्लो वाढतो. 


हा फेसपॅक नियमित आठवड्यातून 2-3 वेळेस चेहर्‍याला लावल्यास अधिक फायदेशीर ठरते.  


अंड आणि लिंबाच्या रसाप्रमाणेच अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये आरारूट पावडर मिसळून फेसपॅक बनवणेदेखील फायदेशीर आहे. हा फेसपॅकदेखील त्वचेचे क्लिन्जिंग करण्यास फायदेशीर ठरते. 


अंड आणि आरारूट पावडर 


एका अंड्याच्या पांढर्‍या भागात दोन लहान चमचे आरारूट पावडर मिसळा. हे मिश्रण एकत्र करून 10-15 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.