तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाता का?
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते.
मुंबई : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते.
यात प्रोटीन, कॅल्शियम आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे शरीराच्या आवश्यक गरजा पूर्ण होतात. मात्र अंडे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवलेले अंडे खाल्ल्यात तुमच्या शरीरास नुकसान पोहोचू शकते. अंड्यासोबतच असे काही पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवल्यास आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
केळी : केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
ब्रेड : अनेकांना ब्रेड फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. यामुळे ब्रेडमधील ओलावा कमी होऊन तो कोरडा पडतो. यासोबतच ब्रेडची टेस्टही खराब होते.
अंडे : अंडी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. अंडी फ्रिजबाहेर सुरक्षित जागी ठेवावीत. फ्रिजमध्ये ठेवल्याने अंड्याची नैसर्गिक चव आणि फ्लेवर बदलतो. त्यामुळे त्यांना बाहेरच ठेवावे.
कॉफी : तुम्हाला कॉफी आवडत असेल तर ही गोष्ट जरुर ध्यानात ठेवा. कॉफी नेहमी थंड, ड्राय आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवावी. कॉफी तुम्ही एअरटाईट बॉक्समध्ये ठेवू शकता.
टोमॅटो - अनेकजण टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र हे चुकीचे आहे. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा फ्लेवर आणि टेस्ट खराब होते.