मुंबई : आरोग्याबाबत काही प्रश्न पडले की आपण प्रथम इंटरनेटवर जाऊन सर्च करतो. अनेकदा आपण डोळे बंद करून इंटरनेटवर आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या काही काळात लोकं इंटरनेवर अधिक वेळ व्यतित करताना दिसतात. बहुतांश समस्येचं निराकरण करण्यासाठी लोकं इंटरनेटची मदत घेताना दिसतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच Frommars.com द्वारे एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात, पुरुष इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात हे पाहण्यात आलं. पुरुष सर्च करत असलेल्या या 5 मिथ म्हणजेच गैरसमजुती असून त्यांच्यापासून दूर राहणं पुरुषांच्या फायद्याचं आहे. तर जाणून घेऊया पुरुष इंटरनेटर आरोग्याबाबत काय सर्च करतात.


  • कमकुवत इरेक्‍शन नपुसंकतेचं लक्षण आहे का? या विषयावर 68,600 लोकं दरवर्षी सर्च करतात.

  • दाढी केल्याने दाढीचे केस जास्त वाढतात का? या विषयावर दरवर्षी सरासरी 68,400 लोक सर्च करतात.

  • पुरुषांना ब्रेस्ट कँसर होतो का? हे करणाऱ्यांची संख्या 61,200 इतकी आहे.

  • टोपी घातल्याने किंवा शेंडी वाढवल्याने पुरुषांचे केस गळतात का यावर सरासरी 52,100 लोक दरवर्षी सर्च करतात.

  • व्यायामानंतर प्रोटीन लगेच घ्यावं की नंतर... त्याचप्रमाणे कोणतं प्रोटीन घ्यावं यावर 51,000 लोकांनी सर्च केलंय.


काय आहेत या प्रश्नांची उत्तरं


जर एखादा पुरुष इरेक्‍शनवेळी अडचण येत असेल तर तो नपुंसकच असेल असं नाही. या समस्येचं काही वेगळं कारणं देखील असू शकतं. ही अडचण वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. यात मधुमेह, लठ्ठपणा आणि हायपरटेन्शनसारख्या अनेक अडचणी कारणीभूत असतात. दैनंदिन आयुष्यात बदल करुन या अडचणींवर मात करता येऊ शकते. 


शेविंग केल्याने केस वाढतात?


तज्ञांच्या मते, शेविंग केल्याने केस वाढतात यासंदर्भात कोणाताही पुरावा नाहीये. केस वाढण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. अनेकदा जास्त औषध घेतल्यामुळे असं होऊ शकतं.


पुरुषांना ब्रेस्‍ट कँसर होतो का?


महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रमाणाच्या तुलनेत पुरुषांना इतक्या प्रमाणात कॅन्सर होत नाही. हे प्रमाण जरी कमी असलं तरी पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो. वयाच्या 60 वर्षानंतर या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं.