अतिप्रमाणात व्यायामही एक व्यसन; एक्सरसाईजचं व्यसन कसं ओळखाल?
निरोगी राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यायामाचंही व्यसन लागतं. निरोगी राहणं, हॅंडसम दिसण्यासाठी सतत व्यायाम करण्याचंही व्यसन लागू शकतं.
मुंबई : दारू, ड्रग्ज, सिगारेट, मोबाईल गेमिंग या व्यसनांबाबत आपल्याला माहितच आहे. व्यसन म्हणजे आरोग्यासाठी घातकच, प्रसंगी जीवघेणं. प्रत्येक जणं आरोग्याला जपतो. व्यसन करणाऱ्यांना अरे हे चांगलं नाही..सोड आता..असा सल्लाही देतो. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतो. पण, तुम्हाला माहितेय. निरोगी राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यायामाचंही व्यसन लागतं. बसला ना धक्का..होय निरोगी राहणं, हॅंडसम दिसण्यासाठी सतत व्यायाम करण्याचंही व्यसन लागू शकतं.
व्यसन म्हणजे काय?
व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं. मानसिक आणि शारीरीक बदल यामुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, ती पाहिजे म्हणून आपण सारखं तेच करतो. यावेळी आपल्या मनावर आपला ताबा रहात नाही. याला व्यसन म्हणतात.
जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन सायकॉलॉजजिकल असोसिएशन या दोन्ही संघटनांकडून एक्सरसाईज हे व्यसन असल्याचं सांगण्यात आलंय.
काही लोकं छान दिसण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी अति-व्यायाम करतात. थोडं जरी जास्त खाल्ल तर वजन वाढेल या भीतीने दुसऱ्या दिवशी शरीरावर जास्त जोर देतात. जराजरी मित्र-मैत्रीणींनी चिडवलं ए जाड दिसतोयस, तर व्यायामाच्या मागे लागतात. पण, हे करताना आपण शरीरावर किती अतिरिक्त ताण टाकतोय हे विसरतात.
अति-व्यायामाचे शारीरिक धोके
दररोजच्या कामानंतर अति प्रमाणात एक्सरसाइज केल्याने क्रॅम्प येणे, काही ठिकाणी दुखापत होणे असा समस्या उद्भवू शकतात. अनेकवेळ परिस्थिती गंभीर होऊन एखादी कायमची दुखापत किंवा व्यंगत्वही येऊ शकतं. गरोदरपणात वजन वाढणं ही चिंता महिलांना असतेच. असावेळी एक्सरसाईज करणं हे आई आणि बाळ दोघांसाठी उपयुक्त असतं. मात्र अशावेळी योग्य प्रमाणात एक्सरसाईज करणं गरजेचं असतं. अति एक्ससाईज केल्यास हार्मोन्सवर परिणाम होतो शिवाय महिलेच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
एक्सरसाईज व्यसन कसं ओळखाल?
एक्सरसाईज एकटे असताना करणं
जीममध्ये असताना सेल्फी काढून अपलोड करणं
एखादी दुखापत झाली असतानाही एक्सरसाईज करणं
आरोग्यासाठी उपयुक्त आहार घेणं
मॅरेथॉनमध्ये धावण्याचा देखील संबंध एक्सरसाईज व्यसनाशी असल्याचं आढळून आलंय