मुंबई : आहारात काही पोषकघटकांची कमतरता निर्माण झाल्यास किंवा नेलपॉलिश रिमुव्हरमध्ये अ‍ॅसिटोनचे प्रमाण अधिकअसल्यास त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. यामुळे नखं ठिसूळ होतात, पटकन तुटतात किंवा त्याचे पापुद्रे निघतात. म्हणूनच नखांना मजबुती देण्यासाठी ब्युटी एक्सपर्ट कुश लवानी यांनी दिलेल्या या टीप्स नक्की लक्षात ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नखांचे पिलिंग होत असल्यास मॅन्डेलिक अ‍ॅसिड सारखे ओटीसी लावा. 


एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईलमध्ये १०-१५ मिनिटं तुमची नखं बुडवून ठेवा. महिनाभर हा प्रयोग केल्यास हळूहळू पिलिंगचा त्रास आटोक्यात येण्यास मदत होईल.


 नखांना नैसर्गिकरित्या मजबूती देण्यासाठी बदामाचे तेलही फायदेशीर ठरते. यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक फायदेशीर ठरतात. परिणामी नखांचा ठिसुळपणा, शुष्कपणा कमी होतो. याकरिता बदामच्या तेलासोबत लिंबाचा रसही मिसळा. 
 
 तुम्ही घरातील काम करत असाल तर त्यामधील डिटरजंट घटकही नखांचे आरोग्य बिघडवतात. त्यामुळे शक्य असल्यास ग्लोव्ह्ज घालून स्वच्छतेची काम करा. सतत अ‍ॅन्टी बॅक्टेरियल साबणाचा वापर टाळा. 
 
 व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीमुळेदेखील नखांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे तुमच्या आरोग्याची तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टी व्हिटॅमिन टॅबलेट्स घ्या. 
 
 अंडी, फ्लॉवर, डाळी, अव्हॅकॅडो यांचा आहारातील समावेश वाढवा. यामधील बायोटीन घटक नखांना बळकटी देण्यास मदत करतात.