Fact Check | डायबेटीस रुग्णांना गुळाचा चहा फायदेशीर? पाहा व्हायरल मेसेजचं सत्य काय?
सोशल मीडियावर आरोग्याबाबत अनेक मेसेज व्हायरल होत असतात. मात्र ते सर्वच खरे असतात असं नाही. मात्र ते आरोग्याशी संबंधित असल्याने अनेक जण ते गांभिर्याने घेतात.
मुंबई : सोशल मीडियावर आरोग्याबाबत अनेक मेसेज व्हायरल होत असतात. मात्र ते सर्वच खरे असतात असं नाही. मात्र ते आरोग्याशी संबंधित असल्याने अनेक जण ते गांभिर्याने घेतात. पण त्या मेसेजची कोणतीही खातरजमा न करता त्यानुसार अवलंब करतात. असाच एक मेसेज व्हायरल होतोय. या व्हायरल मेसेजमध्ये डायबेटीसच्या रुग्णांसाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे...गुळाचा चहा पिणं डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (fact check of viral messege jaggery tea is beneficial for diabetics know what is truth)
या मेसेजमुळे डायबेटीस रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण झाल आहे. .खरंच या दाव्यात तथ्य आहे का? अनेकांना डायबेटीसचा त्रास जाणवतो. त्यामुळे हा व्हायरल मेसेज पाहून अनेकजण घरगुती उपचार करतायत. पण, हा प्रश्न आरोग्याचा असल्याने आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
व्हायरल मेसेज काय?
डायबेटीस रुग्णांसाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे. साखरेपेक्षा गूळ जास्त फायदेशीर आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पोलखोल केली तज्ज्ञांना हा व्हायरल मेसेज दाखवला. खरंच या दाव्यात तथ्य आहे का, हे जाणून घेतलं.
पडताळणीत काय पोलखोल झाली?
डायबेटीस रुग्णांना गुळाचा चहा फायदेशीर हा दावा योग्य नाही. साखर आणि गुळात थोडासाच फरक आहे. गुळामध्ये फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. डायबेटीस रुग्णांना तलफ आल्यास ग्रीन टी प्यावा.
गूळ हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण, डायबेटीस रुग्णांसाठी त्याचं सेवन करणं योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत डायबेटीस रुग्णांना गुळाचा चहा फायदेशीर असल्याचा दावा असत्य ठरला.