सावधान! उपवास करुन तुम्ही या आजाराला देताय आमंत्रण
उपवास करत असाल तर थांबा...
मुंबई : जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी 2 किंवा 3 दिवसाच्या अंतरानंतर उपवास करत असाल तर थांबा... हे तुमच्यासाठी धोक्याचं ठरु शकतं. संशोधकांना यामुळे असं लक्षात आलं आहे की, यामुळे मधुमेह होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही सारखे उपवास करत असाल तर यामुळे हार्मोन इंसुलिनच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.
याबाबत केल्या गेलेल्या शोधात जो निष्कर्ष समोर आला तो बार्सिलोनामध्ये ईसीई 2018 मध्ये इंडोक्रायनोलॉजीच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आला. यामध्ये असं समोर आलं की उपवास करण आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. वजन कमी करण्यासाठी उपवास करण्याच्या बाबतीत गांभीर्याने विचार केला पाहिजे.
मधुमेह ही आता ही एक वैश्विक महामारी होत चालली आहे. असंतुलित आहार आणि बसून राहण्याची जीवनशैली यामुळे मधुमेहचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळेच व्यक्तीचं वजन मोठ्या प्रमाणात वाढण्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
ब्राझीलमध्ये साओ पाउलो विश्वविद्यालयने लावलेल्या शोधात असं समोर आलं आहे की, 'वजन कमी करण्यासाठी वांरवार उपवास केल्याने जठरावर परिणाम होतो. यामुळे निरोगी व्यक्तीच्या इंसुलिन कार्यावर दुष्परिणाम होतात. यामुळे मधुमेह होण्याची दाट शक्यता निर्माण होते'