मुंबई : दिल्लीप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये स्मॉगचा त्रास  आढळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धूर आणि धुकं म्हणजेच धुरक्याचा त्रास वाढतोय. अचानक सकाळी व्हिजिबिलिटी कमी झालेली दिसतेय.  
 
 एखाद्या व्यक्तीचा धूर किंवा  धुरकंयुक्त हवा अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास त्रास होऊ शकतो. यामुळे श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींना अशाप्रकारचा त्रास जाणवत असल्यास हे प्रथमोपचार अवश्य करावेत.  


 ताजी हवा -   


धुरक्यामुळे किंवा धुरामुळे अस्वस्थता जाणवत असल्यास त्या व्यक्तीला ताजी हावा आणि खुली जागा यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. अशा रूग्णाच्या जावळ गर्दी करू नका. त्याला काहीवेळ शांत बसायला द्या. 


पाणी द्या - 


काही वेळेस धूराच्या संपर्कामध्ये आल्यास खोकला येतो. खोकल्याचा त्रास खूपच वाढल्यास त्या  रुग्णाला काही वेळ आरामात बसवा. खोकला थोडा कमी झाल्यानंतर पाणी प्यायला द्या.  


कपडे मोकळे करा - 



धूरामुळे एखादा रुग्ण बेशुद्ध झाला असल्यास त्याचे कपडे थोडे मोकळे करा. मानेजवळचा भाग खुला करा. त्या  रुग्णाच्या श्वास तपासा. गरज असल्यास तात्काळ CPR पद्धती आजमवा.  


झोपवा 


एखादी व्यक्ती बेशुद्ध होत असल्यास किंवा बसू शकत  नसेल तर त्याला झोपवा. मान थोडी मागच्या बाजूला झुकवा. मानेखाली उशी ठेवा. तसेच पायही थोडे वरच्या बाजूला करा.  


वैद्यकीय मदत  - 


एखादी व्यक्ती बेशुद्ध झालेली आढळल्यास त्याला एका बाजूवर वळवा. यामुळे चोकिंग होणार नाही. दरम्यान त्याव्यक्तीला योग्य वैद्यकीय मदत मिळावी याकरिता मदत करा. अ‍ॅम्ब्युलन्स बोलवा.