नाकातून वाहणारं रक्त थांंवण्यासाठी करा `हे` प्रथमोपचार !
उन्हाळयात कडक उन्हामुळे चक्कर येणे, डीहायड्रेशनचा त्रास जाणवणं या समस्या सर्रास जाणवतात. अनेकदा तुम्हांला अशावेळेस नेमके काय करायचे हे ठाऊक असतं. परंतू या दिवसात नाकाचा घोळणा फुटण्याचा, नाकातून रक्तप्रवाह होण्याचा धोकाही असतो. अशावेळेस अनेकजण घाबरतात. पण काही प्रथमोपचारांच्या मदतीने हा त्रास आटोक्यात ठेवण्यात येऊ शकतो.
मुंबई : उन्हाळयात कडक उन्हामुळे चक्कर येणे, डीहायड्रेशनचा त्रास जाणवणं या समस्या सर्रास जाणवतात. अनेकदा तुम्हांला अशावेळेस नेमके काय करायचे हे ठाऊक असतं. परंतू या दिवसात नाकाचा घोळणा फुटण्याचा, नाकातून रक्तप्रवाह होण्याचा धोकाही असतो. अशावेळेस अनेकजण घाबरतात. पण काही प्रथमोपचारांच्या मदतीने हा त्रास आटोक्यात ठेवण्यात येऊ शकतो.
उन्हाळ्यात घोळणा फुटल्यामुळे असेल किंवा काही जणांमध्ये अचानक रक्तदाब वाढल्याने, एखादी इजा झाल्याने नाकातून अचानक रक्तस्त्राव होऊ शकतो. म्हणूनच नाकातून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी नेमके काय करावे हे नक्की जाणून घ्या.
कसे थांबवाल नाकातून वाहणारे रक्त ?
1. नाकातून रक्त वहायला लागल्यानंतर लगेच घाबरून जाऊ नका. तुम्ही उभे असाल तर खाली बसा. नाकपुडीजवळ रूमाल ठेवा. नाक चोळून वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू नका.
2. पहिले बोट आणि अंगठ्याच्या मदतीने नाकाच्या वरचा भाग पकडून ठेवा. बोटाच्या चिमटीत नाक सुमारे 5-7 मिनिटं पकडा. रक्ताचं क्लॉटिंग होण्यासाठी हा वेळ पुरेसा असतो.
3. नाकावर आईस पॅक लावा. यामुळे रक्त थांबायला मदत होते. काही वेळेस डॉक्टर नेसेल पॅकचाही सल्ला देतात. ज्याचा वापर थेट नाकात केला जातो.
4.प्रथमोपचार करताना पाठीवर झोपा. यामुळे नाकाजवळ असलेला दाब पुन्हा संतुलित होण्यास मदत होते. झोपताना डोकं, पाय सरळ रेषेतच ठेवा.
प्रथमोपचार केल्यानेही रक्त थांबत नसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.