टुथब्रशच्या वापराने करु शकता या पाच गोष्टी
टुथब्रशचे असेही फायदे होतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मुंबई : टुथब्रश वापराबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. जसं की, टुथब्रश कधीच ओला करु नये. असे केल्याचे टुथब्रशचा दातांवर होणारा परिणाम कमी होतो. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.आतापर्यंत तुम्ही दातांच्या स्वच्छतेसाठी टुथब्रशचा उपयोग होतो हे ऐकला असाल. पण याचा उपयोग अनेक घरगुती कारणांसाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे वापर झाल्यावर टुथब्रश फेकून देऊ नका. त्याचे असेही फायदे होतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
दातांच्या स्वच्छतेव्यतिरिक्त टुथब्रशने नखं साफ केली जाऊ शकतात.
याशिवाय तुम्ही मेनीक्योर आणि पेडीक्योर देखील करु शकता.
ओठांवर जमा झालेली मृत त्वचा काढण्यासाठी टुथब्रशचा उपयोग होतो. यासाठी ओठांवर हलका दबाव टाकत टुथब्रशचा वापर करा.
हेअर ड्रायर साफ करण्यासाठी, फणीतील घाण साफ करण्यासाठीही टुथब्रशचा वापर केला जातो.
केस रंगविण्यासाठी किंवा हायलाईंटींग करण्यासाठीही टुथब्रश मोठ्या कामाची वस्तू आहे.
याचीही खबरदारी घेणे गरजेचे
त्याचबरोबर ब्रश झाल्यानंतर पाण्याने अगदी खळखळून चूळ भरा. त्यामुळे टुथपेस्टचा अंश तोंडात राहणार नाही. तसंच ब्रशवरील बॅक्टेरीया दूर करण्यासाठी तुम्ही जर ब्रश ओला करत असला तर त्याऐवजी ब्रशसाठी योग्य कव्हरचा वापर करा. ब्रश आणि ब्रश कव्हर देखील नियमित बदलणे गरजेचे आहे.
गंभीर परिणाम -
1. अनेकजण ब्रश करण्यापूर्वी तो भिजवतात. या ब्रशवर पेस्ट लावल्यानंतर ती डायल्यूट होते. अशा ब्रशने दात घासल्याने त्याचा प्रभाव कमी होतो. यामुळे ब्रशही खराब होतो.
2. काहीजण वॉशरुममध्ये तर काही जण वॉश बेसिन जवळ टुथ ब्रश ठेवतात. अनेकदा वॉशरूममधील कीटाणू ब्रशवर जाऊ शकतात. हे डोळ्यांना दिसत नसले तरीही आरोग्याला त्रासदायक आहेत.
3. तुम्ही टुथब्रश ठेवत असलेला स्टॅन्डदेखील महिन्यातून एकदा स्वच्छ करणं आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा तुमचा टुथ ब्रश होल्डरही साफ करा. हे बॅक्टेरिया तोंडात, पोटात जाऊन आजार बळावू शकतो.
4. बाजारात ब्रशप्रमाणेच ब्रिसल सुरक्षित ठेवण्यासाठीही बॉक्स मिळतो. ब्रश सुरक्षित रहावा म्हणून तुम्हीही असा बॉक्स विकत घेत असाल तर ही चूक टाळा. कारण ओला ब्रश झाकून ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. म्हणूनच ब्रश वापरल्यानंतर तो उभा ठेवा. म्हणजे पाणी निथळून जाईल.
5.एका ब्रश होल्डरमध्ये सार्यांचे ब्रश दाटीवाटीने ठेवण्याची चूक करू नका. एकातून दुसर्यामध्ये सहज बॅक्टेरिया पसरू शकतात. जवळजवळ ब्रश ठेवल्याने दुसर्याचा ब्रश वापरल्याची चूकदेखील होऊ शकते.
6. अमेरिकन डेंटल असोसिएशनद्वारा देण्यात आलेल्या माहिनुसार, दर तीन महिन्यांनी टुथब्रश बदलणं अत्यावश्यक आहे. सतत किंवा झीजेपर्यंत एकच ब्रश वापरल्याने तोंडाचे आरोग्य बिगडू शकते. यामुळे दातांसोबत आरोग्यही बिघडू शकते.