मुंबई : आरोग्य उत्तम राहावं यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो. खूप फळं ज्युस आणि मिल्क शेकचा आहारात वापर करत असतो. मात्र चुकीच्या पद्धतीनं काही फळं, ज्युस किंवा मिल्क शेक घेतले तर त्याचा तोटा आपल्याला जास्त होण्याचा धोका असतो. आयुर्वेदानुसार बनाना शेक वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देणारा ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूध आणि केळ हे दोन्ही वेगवेगळं घेतलं तर ते आरोग्यासाठी फायद्याचं असतं. मात्र दोन्ही एकत्र करून खाल्लं तर मात्र धोक्याचं आहे. बनाना शेक हा आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहे. त्याचे फायदे कमी आणि होणारं नुकसान जास्त आहे. 


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फळ आणि दूध हे एकत्र घेऊ नये. दूध आणि फळांचे स्वरूप वेगळे आहे. हे दोन्ही एकत्र घेतल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. केळीचा शेक नियमितपणे प्यायल्यास शरीरात वेदना होऊ शकतात.


बनाना शेकमुळे फायदा होत नाही, उलट नुकसान होते. 


प्रत्येक फळामध्ये थोड्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड किंवा अशी ऍसिड असतात जे दुधात मिसळल्यानंतर दूध फुटते. केळ्यामध्ये काही नैसर्गिक रासायनिक घटक देखील असतात जे दुधात मिसळतात पचनासाठी जड होतात. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.


अचानक बनाना शेक प्यायल्याने अपचनाचा समस्या होऊ शकतात. गॅसची समस्या होऊ शकते शिवाय कफाचा त्रास होऊ शकतो. नियमित बनाना शेक घेणाऱ्यांना ट्राई ग्लेसराइड किंवा कॉलेस्ट्रॉलचा त्रास होऊ शकतो. 


केळी आणि दूध एकत्र करून शेक घेतल्याने वेदनांचा त्रास होऊ शकतो. केळी खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे देखील हानिकारक ठरू शकते. पोटात गेल्यावर या दोन्ही गोष्टी शेक सारख्या हानीकारक ठरतात. यामुळे पोट खराब होणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.


केळ खाल्ल्यावर लगेच दूध पिऊ नये ते देखील शरीरासाठी चांगलं नाही. केळ खाल्ल्यानंतर 1 तासानं दूध घेतलं तर फायदा जास्त होतो. त्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. त्वचा हेल्दी होते.