मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. किडनीची विशेष काळजी न घेतल्यास ती निकामी होण्याची शक्यता जास्त वाढते. आपले शरीर विषारी पदार्थांनी भरलेले असते. साफसफाईचे काम किडनी करु शकते, पण या अवयवालाही साफसफाईची गरज असते. भारतातील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ निखिल वत्स यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे  (vatsionutrition) सांगितले की कोणत्या गोष्टी खाल्ल्याने किडनी स्वच्छ होते. याबाबत अधिक जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही एक ग्लास शुद्ध आणि ताजा क्रॅनबेरी का जूस (Cranberry Juice) किमान एक आठवडा प्या. हा ज्युस त्याच्या अँटी-इन्फेक्शन प्रभावासाठी ओळखला जातो. तो मूत्राशय आणि मूत्रमार्ग साफ करतो.



सकाळी सर्वप्रथम कच्ची लसूण खा किंवा लसणाच्या 5-6 पाकळ्या एक कप पाण्यात उकळवा आणि नंतर पाणी कोमट झाल्यावर प्या. यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशय जलद लघवी करण्यास मदत करते.



हळद ही बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करते तसेच मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे संक्रमणापासून संरक्षण करते. त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा समावेश करणे खूप गरजेचे आहे.



आलं हे पित्तवर्धक आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे मूत्रपिंडातील खनिजे कमी होतात. कच्चे आले आणि 2-3 कप आल्याचा चहा घेतल्याने मूत्रपिंड स्वच्छ करण्याचा एक चांगला मार्ग आहे.



एक कप बीन्स 2-3 लिटर पाण्यात मंद आचेवर उकळा. त्याचे पाणी कोमट होईपर्यंत थांबा. दिवसातून एकदा हे पाणी प्या, विषारी घटक आणि मॅक्रोब्सपासून सुटका मिळते. तसेच, जळजळ देखील कमी होते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती  घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. 24TAAS त्याची पुष्टी करत नाही.)