मुंबई : उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळावी म्हणून सारेच पावसाची वाट पाहतात. पावसामुळे वातावरणात अल्हाददायक थंडावा निर्माण होत  असला तरीही आजारपण वाढण्याचा धोका असतो.  दुषित पाण्यामुळे, चिखल, दलदलीमुळे आजारपणाचा धोका अधिक असतो. तसेच संसर्गजन्य आजार  झपाट्याने वाढण्याचा धोका असल्याने आहाराच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात कोणती फळं,भाज्या खाव्यात याबाबतचा खास सल्ला जाणून घ्या.  


कोबी, पालक -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन घटक असतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात अशा भाज्यांपासून दूर रहा. चिखल, दलदलीमुळे पालेभाज्यांमध्ये लहान लहान कीडे, त्यांची अंडी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच पावसाळ्यात अशा भाज्या घेणं टाळा. या भाज्यांचा आहारात समावेश करायचा झाल्यास त्या चिरण्यापूर्वी कोमट पाण्यात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. ऋजुता दिवेकरच्या 'या' डाएट टीप्सने पावसाळ्यात रहा हेल्दी !


बटाटा -  


पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावलेली असते. बटाट्याच्या वापर आहारात विविध प्रकारे केला जाऊ शकतो. भजी, भाज्या, वडे अशा विविध प्रकारचे चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र इतर भाज्यांच्या तुलनेत बटाटा पचायला अधिक वेळ लागतो. म्हणूनच या दिवसात बटाट्याचा वापर बेताने करावा.   गरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका


कच्च सलाड -  


निरोगी स्वस्थ्यासाठी आहारात सलाडचा समावेश केला जातो. मात्र पावसाळयाच्या दिवसात सलाड खाण्यापासून दूर रहा. कच्च्या भाज्यांचा थेट आहारात समविष्ट करण्यापूर्वी त्या नीट स्वच्छ करणं आवश्यक आहे. फळांनादेखील फार काळ कापून ठेवू नका. बाजारात मिळणार्‍या, उघड्यावर विकल्या जाणार्‍या फळांच्या, भाज्यांचा रसापासूनही दूर रहा.  पावसाळ्यात फळे खाण्यापूर्वी करा 'हे' काम!


मासे - 


पावसाळ्याच्या दिवसात मांसाहारापासून आणि प्रामुख्याने माशांच्या सेवनापासून दूर रहा. हा काळ त्यांच्या प्रजनन काळाचा असल्याने मासे खाणं टाळणं आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. या '४' कारणांमुळे पावसाळ्यात मासे खाणे ठरते नुकसानकारक!


मशरूम -


पावसाळ्याच्या दिवसात मशरूमचं सेवन टाळा. या दिवसात मशरूम खल्ल्याने इंफेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो.  पावसाळ्यात इंफेक्शन टाळण्यासाठी या ५ गोष्टींची खबरदारी घ्या!