या '४' कारणांमुळे पावसाळ्यात मासे खाणे ठरते नुकसानकारक!

मासे आवडणाऱ्या लोकांना मासे खाणे टाळणे, शक्य होत नाही. 

Updated: Jun 27, 2018, 11:32 AM IST
या '४' कारणांमुळे पावसाळ्यात मासे खाणे ठरते नुकसानकारक! title=

मुंबई : मासे आवडणाऱ्या लोकांना मासे खाणे टाळणे, शक्य होत नाही. माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे एरव्ही आरोग्यास फायदेशीर ठरणारे मासे पावसाळ्यात मात्र नुकसानकारक ठरतात. पण त्यामुळे मासे खाणे टाळलेलेच बरे. अन्यथा जीभेची चव आरोग्यास त्रासदायक ठरेल. परंतु, पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घेऊया...

माशांचा प्रजननाचा काळ

हा मौसम मासे आणि अन्य समुद्री जीवांसाठी प्रजननाचा काळ असतो. अंडी असलेले मासे खाल्याने पोटात इंफेक्शन आणि फूड पॉयजनिंग होण्याचा धोका वाढतो.

खराब पाणी

पावसाळ्यात जल प्रदूषणाची संभावना वाढते. अशावेळी माशांवर घाण जमा होते. पाण्याने धुतल्यानंतरही तो थर निघून जात नाही. असे मासे खाल्याने टायफाईड, काविळ आणि डायरिया यांसारखे आजार होऊ शकतात.

ताजे मासे मिळणे कठीण

पावसाळ्यात मच्छीमारी बंद असते. त्यामुळे बाजारात ताजे मासे मिळणे कठीण होते. पॅक किंवा स्टोर केलेले मासे मिळतात. मासे अधिक काळ स्टोर केल्याने खराब होऊ शकतात. हे खाल्याने इंफेक्शनचा धोका वाढतो.

प्रिजर्वेटिव्हचा वापर

माशांना बॅक्टेरीया आणि यीस्टपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सल्फाटेस आणि पोलीफोस्पाटेस यांसारखे प्रिजर्वेटिव्हज वापरले जातात. असे मासे खाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. त्याचबरोबर हृदयविकार यांसारखे आजार होऊ शकतात.