दृष्टी सुधारण्यासाठी हे पदार्थ ठरतील फायदेशीर!
आरोग्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे.
नवी दिल्ली : आरोग्यासाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. काही ठराविक पदार्थांपासून आपल्याला विशिष्ट पोषकघटक मिळत असतात. जे विशिष्ट अवयवयांसाठी महत्त्वाचे आणि गरजेचे ठरतात. डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव. त्याशिवाय आपले जीवन म्हणजे अंधःकार. म्हणून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच आपल्या जीवनशैलीमुळे आपण अधिक वेळ कम्प्युटर किंवा मोबाईलसमोर असतो. त्यामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. त्याचबरोबर आजकाल मधूमेह सामान्य झाला आहे. त्याचाही डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स...
व्हिटॉमिन ए आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे गाजर, हिरव्या पालेभाज्या, पपई या पदार्थांचा आहारात समावेश करा.
खजूर, संत्रे, टोमॅटो, बदाम हे पदार्थ अवश्य खा.
त्याचबरोबर मानसिक तणावही कमी करा.
मध आणि एक चमचा वेलची पावडर एकत्र करून ते मिश्रण खा.
आयुर्वेदानुसार, लसूण आणि आवळा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठऱतो.
दृष्टी सुधारण्यासाठी पायांच्या तळव्यांना थोडेस तूप लावा.
त्रिफळा डोळ्यांसाठी अतिशय परिणामकारक आहे. मोतीबिंदू वाढण्यापासून संरक्षण होते.