मुंबई : हेल्दी आणि फिट राहण्यासाठी व्यायाम करणे किंवा जिमला जाणे तरुणाईमध्ये सर्रास आढळते. पण त्याचबरोबर शरीराच्या विकास आणि मजबूतीसाठी पोषकतत्त्वांची आवश्यकता असते. त्यासाठी प्रोटीन, फायबर्स आणि व्हिटॉमिन युक्त पदार्थांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून जे नियमित व्यायाम किंवा जिम करतात. त्यांनी वर्कआऊटनंतर शरीराला झटपट ऊर्जा प्रदान करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. यासाठी हे हेल्दी पदार्थ खाणे फायदेशीर ठरेल. 


सुकामेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्कआऊट केल्यानंतर शरीराला ऊर्जेची गरज असते. पण कमी प्रमाणात खावूनही अधिक ऊर्जा देणारे पदार्थ खाणे, आवश्यक आहे. त्यासाठी सुकामेवा हा उत्तम पर्याय आहे. काजू, बदाम, पिस्ता, मनुके इत्यादी यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात, त्यातून शरीराला ताकद मिळते. त्याशिवाय इतर आजारांपासून संरक्षण होते.


रताळे


ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणजे रताळे. यात कार्बोहाइड्रेट आणि अॅंटीऑक्सीडेंट असतात, जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे वर्कआऊटनंतर रताळे खाणे फायदेशीर ठरते. 


अंडे


अंड्यात प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे स्टॅमिना आणि ताकद वाढण्यास मदत होते. कच्चे किंवा उकडलेले अंडे वर्कआऊटनंतर खाऊ शकता. यामुळे रक्तात गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. 


ओट्स


ओट्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॉमिन बी असते. त्यामुळे शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते. वर्कआऊटनंतर ओट्स खाल्याने शरीराची क्षमता आणि ताकद वाढते. ओट्स तुम्ही दुधासोबत घेऊ शकता. ते पचनास हलके असून त्यातील कार्बोहायड्रेट रक्तात मिसळून शरीराला ऊर्जा प्रदान करतात. 


केळे


केळ्यात भरपूर प्रमाणात आयर्न, व्हिटॉमिन्स, मिनरल्स, अॅँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशिअम असते. त्यामुळे नर्व्हस सिस्टम ठीक होते आणि पेशी मजबूत होतात. केळे सहज उपलब्ध होते आणि त्यातून शरीराला झटपट ऊर्जा मिळते.