मुंबई : मीठ कमी आणि भाज्या-फळे अधिक प्रमाणात खाण्याचा सल्ला उच्च रक्तदाब असणाऱ्यांना हमखास दिला जातो. परंतु, या काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहतो. जाणून घ्या या पदार्थांविषयी...


लसूण:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसणामुळे नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती वाढते. मसल रिलॅक्ससेशन सहज होते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणून आरोग्यदायी फायद्यांसाठी आहारात लसणाचा समावेश करा किंवा सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी कच्चा लसूण खा.


टोमॅटो:


आहारात टोमॅटोचा समावेश करा. कारण त्यामुळे बीपी कमी होण्यास मदत होते. परंतु, याचा परिणाम त्याचा परिणाम तेव्हाच दिसून येतो जेव्हा अँटी हायपरटेन्सिव्ह औषधे कमी प्रमाणात घेतली जातात.


अळशी:


अळशीमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे बीपी कमी होण्यास मदत होते. म्हणून आहारात अळशी समाविष्ट करा.


डाळिंब:


डाळींबामध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह गुणधर्म आहेत. त्यामुळे त्याचे फायदे मिळवण्यासाठी रोज डाळिंबाचा रस प्या किंवा स्नॅक्स म्हणून एक डाळिंब खा.


चॉकलेट/Cocoa Bean:


कोकोआ पावडर मध्ये flavonoids उत्तम प्रमाणात असते. त्यामुळे नायट्रिक ऑक्साईडच्या निर्मितीला चालना मिळते. vasodilatation वाढते आणि endothelial dysfunction कमी होते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ४६ ते १०५ ग्रॅम कोकोआ पावडर रोज खाल्यास त्यातून २१३ ते ५०० मिलिग्रॅम cocoa polyphenols मिळतात. त्यामुळे बीपी ५ mmHg आणि ३ mmHg diastolic ने कमी होण्यास मदत होते.