पोट साफ होत नसल्यास हे ५ पदार्थ खाणे टाळा!
पोटाचे आरोग्य व्यवस्थित राखणे अत्यंत गरजेचे आहे.
मुंबई : पोटाचे आरोग्य व्यवस्थित राखणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शरीराच्या अनेक क्रिया पोटाशी निगडीत असतात. अवेळी खाणे, अपूरी झोप यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. पोट साफ न झाल्याने अनेक शारीरिक-मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी हे ५ पदार्थ खावू नका.
दुधापासून बनलेले पदार्थ
दुधापासून बनलेले पदार्थ पचण्यासाठी खूप वेळ लागतो. यात फॅट्स अधिक प्रमाणात तर फायबर्स कमी प्रमाणात असतात. अन्नाचे नीट पचन होत नसेल तर दुधापासून बनलेले पदार्थ खाल्याने बद्धकोष्ठता होण्याची शक्यता अधिक असते.
चिप्स
चिप्स अपचनाची समस्या अधिक वाढवतात. बटाट्यात फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते पचण्यासाठीही इतर पदार्थांपेक्षा अधिक वेळ लागतो. यामुळे चिप्स, तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
फ्रोजन फूड
फ्रोजन फूड पोटात गडबड करु शकतात. त्यामुळे ते खाणे टाळा. त्याऐवजी ताजी फळे, भाज्या याचा आहारात समावेश करा.
बिस्कीट
बिस्कीट, कुकीजमध्ये मैद्याचे प्रमाण अधिक असते. मैदा पोटासाठी हानिकारक असतो. त्यामुळे याचे सेवन टाळा.
कच्चे केळे
अन्नपचनासाठी केळे अतिशय फायदेशीर ठरते. पण जर केळे कच्चे असेल तर याचा प्रभाव उलटा होतो. त्यामुळे चुकूनही कच्चे केळे खावू नका.