राहा फीट, राहा यंग!
...यामुळे तुम्ही दीर्घकाळ फीट तर राहालच पण तरुणही दिसाल
मुंबई : वयाच्या आधीच थकलेले आणि सुरकुत्या पडलेले चेहरे तुम्ही पाहिलेच असतील... बहुतांश वेळा हे चेहरे शरीरापेक्षा मनाने जास्त थकलेले असतात. तुम्हालाही अशीच काहिशी परिस्थिती टाळायची असेल तर तुम्हाला गरज आहे ती आरोग्याकडे लक्ष देण्याची... अवेळी वृद्धत्व टाळायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा समावेश तुमच्या आहारात करण्याची गरज आहे... यामुळे तुम्ही दीर्घकाळ फीट तर राहालच पण तरुणही दिसाल.
बदाम
बदाम खाल्ल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. जी हेल्थ आणि ब्रेन दोन्ही गोष्टींना मजबूत करते. यात मोनो सॅच्युरेटेड वसा-प्रोटीन आणि पोटॅशिअम सुद्धा असतं. याचे सेवन केल्यास शरिरात शक्ती आणि चमक राहते.
सफरचंद
सफरचंदमध्ये पेक्टिन असतं. जे स्किन टोनरच्या रूपात घेतलं जातं. त्यासोबतच यात अॅंटी ऑक्सीडेंट आणि फ्रूट अॅसिड सुद्धा असत. जर दररोज याचं सेवन केलं तर तुमच्या शरिरात आणि चेहऱ्यावर चमक राहते.
दही
दही खाणे हे वाढत्या वयासाठी खूप लाभदायक मानलं जातं. दही हे कॅल्शिअमचं चांगलं स्त्रोत मानलं जातं. त्यासोबतच यात जीवित बॅक्टेरिया असतात जे पचनासाठी फायद्याचे असतात. दही रोज खाल्ल्यास त्यामुळे त्वचेवर चमक दिसते.
पपई
पपई सुद्धा जवान-तरूण दिसण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावते. यात व्हिटॅमिन ए, बी, सी मॅग्नेशिअमने भरपूर अॅंटी ऑक्सीडेंट आणि पपेन नावाचं एनजाईम असतं. ज्यामुळे याचे सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.
मासे
मासे खाल्ल्यानेही तुम्हाला तरूण दिसण्यास मदत होते. ‘ट्यूना, सार्डिन, हेरिंग, लेक, ट्राऊट, मॅकेरल, सॅल्मन सारख्या मास्यांमध्ये ओमेगा तीन फॅटी अॅसिड असतं. त्याने त्वचा ताजी राहते.
केळी
केळी हे फळ सदाबहार फळांमध्ये येतं. यात पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असतात. हे पचनक्रियेसाठी फायदयाचे आहे.
टोमॅटो
टोमॅटो सर्वात चांगलं अॅन्टी एजिंग फूड मानलं जातं. यात लाइकोपिन आढळलं. त्यासोबतच यात त्वचेला तरूण ठेवणारे अॅन्टी ऑक्सिडेंट्सही असतात. त्यामुळे तरूण दिसण्यासाठी टोमॅटो खाणे अधिक फायद्याचे असते.