तुम्ही दररोज खात असलेल्या `या` पदार्थांनी दातांचं आरोग्य येतंय धोक्यात
जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे दातांना हानी पोहोचवू शकतात आणि त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात.
मुंबई : सध्याच्या जीवनशैलीमुळे स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. अशावेळी आपण आरोग्यावर अधिक भर देतो. मात्र तोंडाच्या आरोग्याची काळजी तेवढ्या प्रमाणात घेत नाही. काही पदार्थांच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे दातांना हानी पोहोचवू शकतात आणि त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात.
बटाट्याचे वेफर्स
बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे ते दातांमध्ये अडकून बसतात. बटाटा वेफर्स हे देखील दात किडण्यास कारणीभूत पदार्थांपैकी एक आहे. त्यामुळे दातांसंबंधी समस्या असणाऱ्यांना बटाट्याच्या चिप्सचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
ड्राय फूट्स
ड्राय फूट्स सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं, परंतु तुम्हाला माहित आहे का की, ड्राय फूट्सचं जास्त सेवन केल्याने दात खराब होऊ शकतात. ज्यामुळे दातांमध्ये कॅविटी होऊ शकते. त्यामुळे दात निरोगी ठेवायचे असतील तर ड्रायफ्रुट्सचे सेवन मर्यादित प्रमाणात करावं. जर तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करत असाल तर त्यानंतर नक्कीच पाणी प्या.
कॅंडी
कँडीचं सेवन दातांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कँडीचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो, त्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात. शिवाय कॅंडी चिकट असल्याने त्या दाताला अडकतात यामुळे दातांसंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात.