मुंबई : फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का? पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.


- पपईने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पपईमध्ये जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. वयानुसार दृष्टी राहण्यासाठी पपई खाणे फायदेशीर केव्हाही चांगले असते.


- पपई खल्ल्याने पचन सुधारते. जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये पचनशक्तीवर परिणाम होतो. मात्र पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.


- वजन कमी करण्यास उपयुक्त फळ आहे. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते. मात्र पपईने या भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते. 


- एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असल्याने पोट भरते. याशिवाय पपईमध्ये असणारे फायबर्स भूकेवरील नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरते.


- पपई खाणे केव्हाही चांगले. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला शीण कमी होण्यास मदत होते. 


- पपई खाण्यामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण संतुलित राखण्यासही मदत होते.