मुंबई : वजन कमी करायचे असेल सकाळच्या नाश्त्यामध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाणे गरजेचे असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता जरुर करा. अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक कप रासबेरी - एक कप रासबेरीमुळे शरीराला ८ ग्रॅम फायबर मिळते. जनरल न्यूट्रिशन रिसर्चनुसार रासबेरी वजन वाढणे रोखते तसेच वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये रासबेरी खाणे चांगले. 


ओटमील - ओटमील वजन कमी करण्यास मदत करते. यात हाय फायबर सतात ज्यामुळे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. 


अंडे - वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये अंडे खाणे हा सर्वात चांगला उपाय आहे. यात कार्ब, फॅट आणि प्रोटीन्स असतात ज्यामुळे पटकन भूक लागत नाही. 


ड्रायफ्रुट्स - ड्रायफ्रुट्सही वजन कमी करण्यास मदत करतात. स्टडीनुसार, ड्रायफ्रुट्समध्ये फॅट, प्रोटीन आणि फायबर यांचा परफेक्ट बॅलन्स असतो.  ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन कमी करण्यासोबतच हृदयरोगाची समस्याही कमी होते. 


पीनट बटर - पीनट बटर खाल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. गव्हाच्या ब्रेडवर २ चमचे पीनट बटर लावून खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.