गोड आरोग्यासाठी धोकादायक, या चार पदार्थाने वाढते वजन, राहा सावधान
या चार पदार्थांमुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते. हे चार पदार्थ आरोग्याचे दुश्मन आहेत.
मुंबई : गोड खाण्यासाठी प्रत्येक जण पुढे असतो. मात्र प्रमाणात गोड खाल्ल तर त्याचा त्रास होत नाही. परंतु जास्त गोड खात असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. मिठाई, केक आणि आयस्क्रीम यांचे नाव घेतले तर तोंडाला पाणी सुटते. कारण हे पदार्थ अन्य गोड पदार्थापेक्षा वेगळे आणि चविष्ट आहेत. मात्र, ते शरीरासाठी हानिकारक आहेत. मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, पेस्ट्री केक, आयस्क्रीम या चार पदार्थांमुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते. हे चार पदार्थ आरोग्याचे दुश्मन आहेत. जर तुम्ही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर यावर नियंत्रण हवे.
मिठाईशिवाय कोणताही उत्सव पूर्ण होत नाही. बाजारात विविध प्रकारची मिठाई तसेच गोड पदार्थ उपलब्ध असतात आणि तेही विविध रंगात. सण आणि उत्सवाच्या दिवशी मिठाईला मोठी मागणी असते. आता दिवाळी आली आहे. त्यामुळे मिठाईच्या दुकानात गर्दी दिसून येईल. मात्र, जास्त गोड आणि मिठाईचे पदार्थ खाल्ले तर तुमचे वजन वाढलेच म्हणून समजा. कारण मिठाईत तूप, डालडा याचा जास्त वापर केलेला असतो. तसेच खूप प्रमाणात सारखेचा वापर केलेला असता. हे दोन्ही घटक हे वजन वाढविण्यासाठी कारणीभूत आहेत.
काही लोकांना नियमित कोल्ड ड्रिंग पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी चुकीची आहे. याच्या सेवनामुळे डायबिटीज, लठ्ठपणा अशा आजारांना निमंत्रण मिळते. तसेच कोल्ड ड्रिंगमुळे किडनीला इजा पोहोचते. किडनी फेल होण्याचा धोका जास्त असतो. कारण कोल्ड ड्रिंगमध्ये भरपूर प्रमाणात अॅसिडिटीक लिक्विडची आणि फॉस्फोरसची मात्रा जास्त असते.
केकचे नाव घेतले तर तोंडाला पाणी सुटते. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण केक खाणे पसंत करतात. मात्र, केकमध्ये पेस्ट्रीवर आयसिंग लावलेले असते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे हा पदार्थ खाणे धोकादायक आहे. तसेच आयस्क्रिम खाणे प्रत्येक जण प्राधान्य देतो. या मोठ्याप्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे जास्त आयस्क्रिम खाणे हे हृदयरोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तरही जास्त वाढविण्यास मदत करतो. हृदयाचे ठोके वाढविण्यास मदत करतो. साखरेचेही प्रमाण जास्त असते. आयस्क्रिम खाण्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. त्यामुळे या सर्व वस्तू वर्ज्य करा आणि आपले वजन नियंत्रित ठेवा.