स्पेन : जगात अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र युरोपातील देशांमध्ये मास्क आणि लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येण्याची शक्यता आहे. नुकतंच स्पेन सरकारने कोरोनाला सामान्य फ्लू मानलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा केवळ ओमायक्रॉन व्हेरिएंट महामारीला शेवटच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल. आणि आता या प्रक्रियेला सुरू झालीये. 


तज्ञांच्या माहितीप्रमाणे, ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जातोय. अशा परिस्थितीत स्पेनचे पंतप्रधान प्राडो सांचेझ यांनी साथीच्या काळात लादलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय.


ते म्हणाले की, आता ते महामारीच्या समाप्तीच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. परंतु युरोपचं सरकार कदाचित वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर काम करतंय. दुसरीकडे, आयर्लंडमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांना विचार न करता, एक ऐच्छिक लसीकरण प्रणाली तयार केली जातेय. सरकारला आता लसीकरणाच्या बाबतीत स्वतःहून निर्णय घेण्याचा अधिकार लोकांना द्यायचा आहे.


याशिवाय अनेक देशांनी क्वारंटाइन कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवांवर कोणतीही बंधन घालण्यात आलेली नाही. चेक रिपब्लिकने अलीकडेच आयसोलेशनचा कालावधी दोन आठवड्यांवरून केवळ 5 दिवसांवर आणला आहे.


दरम्यान, WHO ने ओमायक्रॉनबाबत बाबत इशारा दिला आहे. जरी डेल्टा प्रकारापेक्षा ओमायक्रॉनमध्ये हा रोग कमी गंभीर असेल परंतु हा सौम्य आजार नाही.